OnePlus Buds: OnePlus ने भारतात आपले नवीन Nord Buds 4 Pro लाँच केले आहेत. फक्त 3,999 रुपयांमध्ये 55dB नॉईज कॅन्सलेशन आणि 54 तासांची बॅटरी लाईफ, जाणून घ्या काय आहे खास.
OnePlus ने आपल्या प्रसिद्ध Nord सिरीजमध्ये नवीन 'OnePlus Nord Buds 4 Pro' इअरबड्स भारतात लाँच केले आहेत. कमी किमतीत फ्लॅगशिप ऑडिओ अनुभव देण्याच्या उद्देशाने हे डिझाइन केले आहेत. 55dB पर्यंत नॉईज कॅन्सलेशन (ANC) आणि दमदार बॅटरी लाईफ ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
25
अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) टेक्नॉलॉजी
या नवीन इअरबड्समध्ये 55 डेसिबल (dB) पर्यंतचा बाहेरचा आवाज रोखणारी 'अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन' (ANC) टेक्नॉलॉजी आहे. Nord Buds सिरीजमध्ये हे सर्वाधिक आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार लाईट, मॉडरेट आणि मॅक्सिमम अशा तीन लेव्हल्समध्ये ANC सेट करू शकता. यात 12mm चे टायटॅनियम-कोटेड ड्रायव्हर्स आहेत, जे जबरदस्त बास आणि स्पष्ट आवाज देतात. गेमिंगसाठी खास 'स्पेशल ऑडिओ' फीचरही यात आहे.
35
हे बड्स तब्बल 54 तास चालतात
बॅटरीच्या बाबतीत, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर (ANC बंद असताना) हे बड्स तब्बल 54 तास चालतात. विशेष म्हणजे, फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये तुम्ही 5 तास गाणी ऐकू शकता. या बड्सना IP55 रेटिंग मिळाल्यामुळे घाम आणि धुळीपासूनही यांचं संरक्षण होतं.
'ब्लूटूथ 6.0' आणि 'LHDC 5.0' टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारे
हे बड्स 'ब्लूटूथ 6.0' आणि 'LHDC 5.0' टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. OnePlus स्मार्टफोन वापरणारे 'HeyMelody' ॲपद्वारे इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषांमध्ये रिअल-टाइम ट्रान्सलेशन करू शकतात. व्हॉल्यूम कमी-जास्त करण्यासाठी यात सोपे स्लाईड कंट्रोल्सही दिले आहेत.
55
23 मार्चमासून ऑनलाईन उपलब्ध
OnePlus Nord Buds 4 Pro ची भारतात किंमत ३,९९९ रुपये आहे. पण, लाँच ऑफर म्हणून तुम्ही हे 3,799 रुपयांना खरेदी करू शकता. हे बड्स रेडियंट ग्रे आणि रेवन ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत. 23 मार्चपासून तुम्ही हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वनप्लसच्या साईटवरून विकत घेऊ शकाल.