Hair Care: केसगळतीवर नूपुर सेननचा रामबाण उपाय! घरीच बनवा ४ वस्तूंपासून जादुई हेअर स्प्रे

Published : Mar 10, 2026, 05:15 PM IST
Holi Hair Care

सार

Hair Care केस गळणं आणि तुटणं ही आजकाल एक मोठी समस्या झाली आहे. पण अभिनेत्री नूपुर सेननने एक असा घरगुती हेअर स्प्रे सांगितला आहे, जो तुम्ही अगदी स्वस्तात बनवून केसांच्या आणि स्काल्पच्या समस्या दूर करू शकता.

DIY Hair Spray By Nupur Sanon: लग्न झाल्यावर अनेकदा केस तुटण्याची समस्या वाढते. हार्मोनल बदल आणि बदललेली जीवनशैली याचा थेट परिणाम केसांवर होतो. भारतात तर जवळपास प्रत्येक दुसरी व्यक्ती निर्जीव आणि तुटणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहे. यावर उपाय म्हणून अनेकजण बाजारातून महागडी उत्पादनं विकत घेतात. पण घरातल्या काही मोजक्या गोष्टी वापरून तुम्ही एक जादुई स्प्रे बनवू शकता.

जर तुम्ही सुद्धा वारंवार होणाऱ्या 'बॅड हेअर डे'मुळे वैतागला असाल, तर बॉलिवूड अभिनेत्री नूपुर सेननचा हा सोपा DIY हेअर स्प्रे तुमच्या खूप कामी येऊ शकतो. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर एक ऑल-नॅचरल हेअर स्प्रेची रेसिपी शेअर केली, जी ती गेल्या ५ वर्षांपासून वापरत आहे. नूपुरच्या मते, हा स्प्रे स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या वस्तूंपासून बनतो आणि त्यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक केमिकल्स नाहीत. त्यामुळेच केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्काल्प निरोगी ठेवण्यासाठी हा स्प्रे मदत करू शकतो.

नूपुर सेननचा सोपा DIY हेअर स्प्रे बनवण्याची पद्धत

हेअर स्प्रेसाठी लागणारं साहित्य

  • १ ते १.५ कप पाणी
  • ताजी किंवा सुकलेली रोझमेरी (Rosemary) पानांची पावडर
  • २ लवंगा
  • १ टेबलस्पून साधी ग्रीन टी
  • १ टेबलस्पून ताजा कोरफड गर किंवा ९९% शुद्ध कोरफड जेल (Aloe Vera Gel)

स्प्रे बनवण्याची विधी

  • सर्वात आधी एका भांड्यात १ ते १.५ कप पाणी उकळवा आणि गॅस बंद करा.
  • आता त्यात ताजी किंवा सुकलेली रोझमेरीची पानं टाका.
  • त्यानंतर त्यात फक्त २ लवंगा टाका. नूपुरच्या मते, जास्त लवंगामुळे स्काल्पला जळजळ होऊ शकते.
  • मग त्यात १ टेबलस्पून फ्लेवर नसलेली ग्रीन टी मिसळा.
  • जेव्हा मिश्रण थोडं थंड होईल, तेव्हा त्यात कोरफड जेल टाकून चांगलं मिक्स करा.
  • तयार मिश्रण गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या.

नूपुर सेनन हा स्प्रे कसा वापरते?

अभिनेत्री हा स्प्रे रात्री झोपण्यापूर्वी तिच्या केसांवर लावते. आधी ती केसांना हलकं तेल लावते, आणि मग हा स्प्रे केस आणि स्काल्पवर स्प्रे करते. त्यानंतर रात्रभर तो तसाच केसांमध्ये राहू देते.

 

किती दिवस वापरता येतो?

नूपुर सेननच्या म्हणण्यानुसार, हा ऑल-नॅचरल हेअर स्प्रे फ्रिजमध्ये ६-७ दिवस चांगला टिकतो. त्यामुळे ती दर आठवड्याला याचा नवीन बॅच तयार करते.

केसांसाठी या गोष्टी कशा फायदेशीर आहेत?

रोझमेरी (Rosemary) – स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.

ग्रीन टी (Green Tea) – यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे स्काल्पचं आरोग्य चांगलं ठेवतात.

कोरफड (Aloe Vera) – स्काल्पला थंडावा देते आणि हलकी जळजळ शांत करते.

लवंग (Cloves) – यामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे स्काल्प स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Chamba Rumal: साक्षी धोनीच्या सूटमुळे 'चंबा रुमाल' पुन्हा चर्चेत, जाणून घ्या काय आहे खासियत
Marodi Embroidery: ईदसाठी ट्राय करा मरोडी एम्ब्रॉयडरी सूट, मिळवा हिना खानसारखा नवाबी लूक