
तुमचं घर किंवा फ्लॅट लहान आहे का? मग फार काही तोडफोड न करता तुम्ही ते मोठं दाखवू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या खोलीच्या रंगात थोडा बदल करावा लागेल. अनेक जण भिंतींना गडद रंग देतात, ज्यामुळे खोली आणखी लहान वाटते. पण बाजारात असे अनेक कलर ऑप्शन्स आहेत, जे तुमच्या भिंतींना सिल्क फिनिश देण्यासोबतच खोलीलाही एकदम प्रशस्त लुक देतील. चला, अशाच ६ रंगांबद्दल जाणून घेऊया.
लहान खोली मोठी दाखवण्यासाठी ऑफ व्हाइट हा सगळ्यात क्लासिक रंग मानला जातो. ऑफ व्हाइट रंगाच्या भिंतींमुळे खोली स्वच्छ, ब्राईट आणि मोठी दिसते. दिवसाच्या प्रकाशात आणि रात्री लाईटमध्येही खोली मोठी आणि सुंदर दिसते.
पेस्टल ब्लू किंवा हलका निळा रंग खोलीला शांत आणि मोकळा लुक देतो, ज्यामुळे खोली अधिक मोठी दिसते. मुलांच्या स्टडी रूमपासून ते बेडरूमपर्यंत तुम्ही हा रंग निवडू शकता. Asian Paints, Nerolac Paints आणि Berger सारख्या मोठ्या ब्रँड्समध्ये तुम्हाला याचे अनेक उत्तम पर्याय मिळतील. उन्हाळ्यात तर हा रंग खोलीला हवेशीर, शांत आणि स्टायलिश लुक देतो.
लाइट ग्रे रंग खोलीला मॉडर्न आणि एलिगंट लुक देतो. त्याचबरोबर लहान खोलीही बरीच मोठी दिसते. तुम्ही बेडरूम, लिव्हिंग रूम, किचनपासून ते बाथरूमपर्यंत संपूर्ण घरात हा रंग वापरू शकता.
मिंट ग्रीन किंवा हलका हिरवा रंग खोलीत एक फ्रेशनेस आणतो आणि खोली मोठी दाखवतो. विशेषतः उन्हाळ्यात तुम्ही हा रंग निवडू शकता. हिरव्या रंगात तुम्हाला एक नाही, तर अनेक शेड्स मिळतील.
हा एक सॉफ्ट आणि वॉर्म टोन देणारा रंग आहे. यामुळे लहान खोली मोठी दिसते आणि थंडाव्याचा फिलसुद्धा येतो. तुम्ही घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मिंट ग्रीन, ऑफ व्हाइटसोबत लाइट बेज रंगाचाही विचार करू शकता.
हा सॉफ्ट आणि एलिगंट रंग सर्व वयोगटातील लोकांना खूप आवडतो. तुम्ही घराच्या भिंतींसाठी पेल पिंक किंवा ब्लश पिंक रंग निवडू शकता. हा रंग लावल्यामुळे, विशेषतः बेडरूम किंवा लहान खोली मोठी आणि ब्राईट दिसू लागते.