Number Plates: गाड्यांना नंबर प्लेट्स का लावल्या जातात? पांढऱ्या, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या प्लेट्सचा अर्थ काय? याचा इतिहास काय आहे आणि भारतात नियम कसे बदलले, चला जाणून घेऊया.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका बटणावर गाडीची नंबर प्लेट बदलते. हे पाहून लोक चकित झाले आहेत. याच दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी 'ऑपरेशन कवच' अंतर्गत बनावट नंबर प्लेट्सवर मोठी कारवाई केली आहे. त्यांनी 2,100 हून अधिक गाड्या जप्त केल्या. एकाच नंबरचा अनेक गाड्यांवर वापर होत असल्याचं समोर आलं. नंबर प्लेटशी छेडछाड केल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिला आहे.
26
वैध नोंदणी क्रमांकाशिवाय गाडी चालवणे हा गुन्हा
मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 41(6) नुसार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) गाडीला एक नोंदणी क्रमांक देतात. हाच क्रमांक गाडीची अधिकृत ओळख असतो. कलम 39 नुसार, वैध नोंदणी क्रमांकाशिवाय गाडी चालवणे हा गुन्हा आहे. हा नंबर गाडीच्या पुढे आणि मागे स्पष्टपणे दिसला पाहिजे, असा नियम आहे.
36
भारतातील नंबर प्लेट एका विशिष्ट पद्धतीनुसार
भारतातील नंबर प्लेट एका विशिष्ट पद्धतीनुसार असते. उदाहरणार्थ, 'TN 06 AB 1234' या नंबरमध्ये, पहिले दोन अक्षर (TN) गाडी कोणत्या राज्यात नोंदणीकृत आहे हे सांगतात. पुढचे दोन अंक (06) त्या राज्यातील RTO किंवा जिल्ह्याची माहिती देतात. मधली दोन अक्षरं (AB) सांगतात की नंबर कोणत्या सिरीजचा आहे. आणि शेवटचे चार अंक (1234) हे त्या गाडीला दिलेला खास युनिक नंबर असतो.
जगात सर्वात आधी फ्रान्सने गाड्यांसाठी ओळख प्लेट सुरू केली. 14 ऑगस्ट 1893 रोजी पॅरिस पोलिसांनी हा नियम आणला. अपघात करून पळून जाणाऱ्या गाड्यांना पकडण्यासाठी ही सुरुवात झाली. तेव्हा नंबरसोबत मालकाचं नाव आणि पत्ताही लिहावा लागायचा. यानंतर 1896 मध्ये जर्मनी आणि 1898 मध्ये नेदरलँड्सने हा नियम देशभर लागू केला. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 1901 मध्ये नंबर प्लेट अनिवार्य झाली. 1903 मध्ये मॅसॅच्युसेट्स राज्याने पहिल्यांदा अधिकृत प्लेट्स दिल्या.
56
भारतात ही सिस्टीम कधी आली?
भारतात ही सिस्टीम अधिकृतपणे ब्रिटिश काळात 1914 च्या भारतीय मोटार वाहन कायद्याने आली. पण त्याआधीच बॉम्बे (1901), बंगाल (1903), मद्रास (1907), पंजाब (1907) आणि बर्मा (1906) यांसारख्या प्रांतांमध्ये स्थानिक नियम होते. गाड्यांची संख्या वाढल्यामुळे 1939 मध्ये एक ठोस प्रणाली आणली गेली. त्यानंतर 1988 चा मोटार वाहन कायदा आणि 1989 च्या नियमांमुळे आजची युनिफॉर्म स्टेट कोड सिस्टीम लागू झाली.
66
नंबर प्लेट्समधील रंग आणि त्यांचे अर्थ
आता नंबर प्लेट्समध्ये अनेक रंग आले आहेत. खासगी गाड्यांसाठी पांढऱ्या प्लेटवर काळी अक्षरं, व्यावसायिक गाड्यांसाठी पिवळी प्लेट आणि इलेक्ट्रिक गाड्यांसाठी हिरवी प्लेट वापरली जाते. फसवणूक टाळण्यासाठी क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि लेझर कोड असलेल्या 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स' (HSRP) आल्या आहेत. 2021 मध्ये 'BH' म्हणजेच भारत सिरीज सुरू झाली. यामुळे नोकरीमुळे दुसऱ्या राज्यात बदली होणाऱ्यांना गाडीची पुन्हा-पुन्हा नोंदणी करावी लागत नाही.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .