Nothing Phone 4a: आता नव्या पिंक कलरमध्येही मिळणार, कंपनीने लॉन्चआधीच डिझाइन दाखवलं!

Published : Feb 28, 2026, 12:19 PM IST
Nothing Phone 4a Pink Variant Confirmed Ahead of March Launch

सार

Nothing Phone 4a : ब्रिटनची स्मार्टफोन कंपनी 'नथिंग'ने आपला नवीन फोन 'नथिंग फोन 4a' लॉन्च होण्याआधीच त्याचा पिंक कलर व्हेरिएंट जाहीर केला आहे. भारतात हा फोन फ्लिपकार्टवर विकला जाईल. कंपनीने डिझाइनमध्ये काही नवीन बदल केले आहेत.

Nothing Phone 4a : ब्रिटनची स्मार्टफोन कंपनी 'नथिंग'ने (Nothing) आपला नवीन मॉडेल 'नथिंग फोन 4a' लॉन्च होण्याआधीच त्याचा पिंक कलर व्हेरिएंट जाहीर केला आहे. याआधी कंपनीने पांढऱ्या रंगाचा फोन दाखवला होता, आणि आता पिंक कलर आणून कंपनीने आपल्या डिझाइनमध्ये आणखी व्हरायटी आणली आहे. कंपनीच्या मते, हा नवीन रंग कला, फॅशन आणि पॉप कल्चरपासून प्रेरित आहे.

नथिंग फोन 4a: काय आहेत फीचर्स?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नथिंग फोन 4a सीरिज मार्चच्या पहिल्या आठवड्यात 'बिल्ट डिफरंट' (Built Different) नावाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सादर केली जाईल. या घोषणेसोबतच कंपनीने लंडन आणि बंगळुरू शहरांमध्ये खास प्रमोशन इव्हेंट्सही आयोजित केले होते. डिझाइनच्या बाबतीत, नथिंग फोन 4a मध्ये आधीच्या मॉडेल्सप्रमाणेच पारदर्शक बॅक पॅनल (Transparent Rear Panel) कायम राहील. 

याच्या मागच्या बाजूला एका पिल-शेप (Pill-shaped) मॉड्यूलमध्ये तीन कॅमेरे दिले आहेत. एलईडी फ्लॅश कॅमेरा युनिटच्या बाहेर असेल. याशिवाय, कंपनीची नवीन 'ग्लिफ बार' (Glyph Bar) नोटिफिकेशन सिस्टीमही या मॉडेलमध्ये असण्याची शक्यता आहे. फोनच्या उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटन्स आहेत, तर डाव्या बाजूला एक अतिरिक्त बटण दिले आहे.

नथिंग फोन 4a सीरिजमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट (Qualcomm Snapdragon chipset) असेल, हे कंपनीने निश्चित केलं आहे. भारतात हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर (Flipkart) उपलब्ध होईल. काही रिपोर्ट्सनुसार, नथिंग फोन 4a मध्ये स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 एसओसी (Snapdragon 7s Gen 4 SoC), 5,400 mAh क्षमतेची बॅटरी आणि 50W वायर्ड फास्ट चार्जिंगची सुविधा असू शकते. यासोबतच, 6.7-इंचाचा 1.5K रिझोल्यूशन असलेला अमोलेड डिस्प्ले (AMOLED display) आणि 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे. नवीन रंग आणि सुधारित हार्डवेअरमुळे नथिंग फोन 4a बाजारात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mahindra BE 07: टाटा हॅरियर EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची नवी इलेक्ट्रिक SUV, 2027 मध्ये होणार लाँच!
Surya Shani Yuti: अशुभ योगाचा कोणत्या राशींना बसणार मोठा फटका? जाणून घ्या अधिक