Indian SUV Market भारतातील मिड-साईज SUV मार्केटमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टॉसमुळे स्पर्धा आधीच वाढली आहे. त्यातच आता 2026 पर्यंत रेनॉ, स्कोडा, फोक्सवॅगन आणि निसान कंपन्या नव्या मॉडेल्ससह दाखल होणार आहेत.
Indian SUV Market भारतात लहान गाड्यांपेक्षा मोठ्या आणि उंच गाड्यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यातही मिड-साईज एसयूव्ही सेगमेंट हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या सेगमेंटपैकी एक बनला आहे.
28
नवीन मॉडेल्स
Indian SUV Market 2026 मध्ये या सेगमेंटमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल. रेनॉ, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आणि निसान यांसारख्या कंपन्या सध्याच्या मॉडेल्सची नवीन आणि अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
38
मोठी वाढ अपेक्षित
Indian SUV Market इंडस्ट्री डेटानुसार, भारतातील एकूण SUV विक्री 2024 मधील 23,20,846 युनिट्सवरून 2025 मध्ये 25,03,000 युनिट्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, जी 7.85% वाढ दर्शवते. तर, मिड-साईज SUV विक्री 2024 मधील 5,64,023 युनिट्सवरून 2025 मध्ये 5,99,928 युनिट्सपर्यंत वाढेल, म्हणजेच 6.37% वाढ अपेक्षित आहे.
Indian SUV Market हा सेगमेंट सर्वात जास्त स्पर्धात्मक आहे. कारण यामध्ये ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, मारुती सुझुकी व्हिक्टोरिस, टाटा सिएरा, टाटा कर्व, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, महिंद्रा थार रॉक्स, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन टायगुन आणि एमजी अॅस्टर यांसारख्या अनेक लोकप्रिय गाड्या आहेत.
58
रेनॉ डस्टर
Indian SUV Market रेनॉ नव्या जनरेशनच्या डस्टरसोबत मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये पुनरागमन करत आहे. गेल्या महिन्यातच ही SUV सादर करण्यात आली असून, तिची प्री-बुकिंग आधीच सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात किंमत जाहीर होईल आणि एप्रिलमध्ये ग्राहकांना डिलिव्हरी सुरू होईल. 2012 मध्ये डस्टरनेच भारतात पहिल्यांदा मिड-साईज SUV सेगमेंटची ओळख करून दिली होती.
68
स्कोडा कुशाक
Indian SUV Market स्कोडाने जानेवारीमध्ये अपडेटेड (फेसलिफ्ट) कुशाक सादर केली. या नवीन SUV ची प्री-बुकिंग आधीच सुरू झाली असून, मार्चच्या अखेरीस डिलिव्हरी सुरू होईल. कंपनीने अद्याप किंमत जाहीर केलेली नाही.
78
फोक्सवॅगन टायगुन
Indian SUV Market प्रीमियम SUV टेरॉन आर-लाइन लाँच केल्यानंतर, फोक्सवॅगन इंडिया 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत टायगुनची अपडेटेड आवृत्ती सादर करण्याच्या तयारीत आहे. स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टायगुन या दोन्ही गाड्या फोक्सवॅगन ग्रुपच्या भारतासाठी खास असलेल्या MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. 1 अब्ज युरो गुंतवणुकीच्या कंपनीच्या 'इंडिया 2.0' योजनेचा हा एक भाग आहे.
88
निसान टेक्टॉन
Indian SUV Market टेक्टॉन हा निसानच्या भारतासाठी असलेल्या नवीन उत्पादन योजनेचा एक भाग आहे. या योजनेअंतर्गत, कंपनी तीन मॉडेल्स लाँच करेल: ग्रॅविट एमपीव्ही, टेक्टॉन मिड-साईज एसयूव्ही आणि एक नवीन 7-सीटर एसयूव्ही. 2026 च्या मध्यापर्यंत टेक्टॉन भारतात दाखल होईल.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .