डिसेंबर महिना सुरू होताच नवीन स्मार्टफोन बाजारात येण्याच्या तयारीत आहेत. लेटेस्ट अपडेटसह अनेक मॉडेल्स दैनंदिन वापरासाठी डिझाइन केले आहेत. विवो, शाओमी, वनप्लस, रिअलमी यांसारख्या सर्वांना आवडणाऱ्या स्मार्टफोनचे नवीन मॉडेल्स या वर्षाच्या अखेरीस बाजारपेठेत येतील अशी अपेक्षा आहे.
विवो एक्स२०० सिरीज
विवो एक्स२०० १२ डिसेंबर रोजी बाजारात येण्याची शक्यता आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी ९४०० चिपसेट उत्तम काम करण्यासाठी डिझाइन केले आहे. विवो एक्स२००, एक्स२०० प्रो हे प्रीमियम फोटोग्राफी आणि डिस्प्ले तंत्रज्ञान देऊ करतात.
आयक्यू०० १३
उद्या आयक्यू०० १३ लाँच होणार आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट आहे. कोणताही अडथळा न येता सर्व कामे आणि गेमिंगसाठी हे तयार केले आहे. ६,००० mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सुविधा फोनमध्ये असण्याची शक्यता आहे.
अॅसस आरओजी फोन ९
डिसेंबरच्या मध्यापर्यंत अॅससचा नवीन स्मार्टफोन येईल. गेमर्सना लक्ष्य करून बनवलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट वापरला आहे. गेमिंगसाठी प्रगत कूलिंग सिस्टम ही त्याची खासियत आहे.
वनप्लस १३
या महिन्याच्या अखेरीस क्रिसमस-नवीन वर्षाच्या भेट म्हणून वनप्लस १३ भारतात येईल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट वापरला आहे.
शाओमी १५
स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट वापरून शाओमी १५ तयार केला आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत हा फोन बाजारात येईल. अत्याधुनिक कॅमेरा फीचर्स आणि ऑप्टिमाइज केलेला MIUI हा शाओमी १५ ची खासियत आहे.
रेडमी नोट १४ सिरीज
रेडमी नोट १४ सिरीजमध्ये ६,२०० mAh बॅटरी वापरली आहे. बजेट फ्रेंडली रेडमी नोट १४ डिसेंबरच्या मध्यापर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.