New ATM Withdrawal Charges 2026: खिश्याला कात्री! १ एप्रिलपासून ATM मधून पैसे काढणे महागणार; HDFC, PNB सह 'या' बँकांचे नियम बदलले, पाहा नवी यादी

Published : Mar 31, 2026, 04:27 PM IST

New ATM Withdrawal Charges 2026: १ एप्रिल २०२६ पासून HDFC, PNB आणि बंधन बँकेच्या ATM व्यवहार नियमांमध्ये मोठे बदल होत आहेत, ज्यामुळे पैसे काढणे महाग होऊ शकते. यामध्ये UPI द्वारे पैसे काढणे मोफत व्यवहारांमध्ये मोजले जाईल. 

PREV
16
खिश्याला कात्री! १ एप्रिलपासून ATM मधून पैसे काढणे महागणार

मुंबई: उद्यापासून म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. यासोबतच सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम करणारे बँकिंग नियमही बदलणार आहेत. प्रामुख्याने HDFC Bank, PNB आणि Bandhan Bank ने त्यांच्या एटीएम (ATM) व्यवहार मर्यादेत आणि शुल्कात मोठे बदल केले आहेत. आता विनाकारण एटीएम वापरणे तुम्हाला महागात पडू शकते. पाहूया नक्की कोणते बदल झाले आहेत. 

26
१. HDFC Bank: UPI मधून पैसे काढणे आता 'फ्री' नाही!

एचडीएफसी बँकेने आपल्या नियमात सर्वात मोठा बदल केला आहे. आता तुम्ही एटीएमवर जाऊन UPI द्वारे (QR Code स्कॅन करून) जे पैसे काढता, ते सुद्धा तुमच्या नियमित 'फ्री ट्रान्झॅक्शन' मर्यादेत मोजले जातील.

स्वतःच्या बँकेचे ATM: महिन्याला केवळ ५ व्यवहार मोफत.

दुसऱ्या बँकेचे ATM: मेट्रो शहरांत ३ आणि नॉन-मेट्रो शहरांत ५ मोफत व्यवहार.

मर्यादा संपल्यावर: प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये + टॅक्स द्यावा लागेल. 

36
२. PNB (पंजाब नॅशनल बँक): पैसे काढण्याची मर्यादा अर्धी केली!

PNB ने आपल्या विविध डेबिट कार्ड्सवरील दररोजची पैसे काढण्याची मर्यादा (Daily Cash Withdrawal Limit) थेट निम्मी केली आहे.

प्लॅटिनम, गोल्ड आणि बिझनेस कार्ड: आधी १ लाख रुपयांची मर्यादा होती, ती आता फक्त ५०,००० रुपये असेल.

सिलेक्ट आणि सिग्नेचर कार्ड: आधी १.५ लाख रुपये काढता येत होते, आता ही मर्यादा ७५,००० रुपये करण्यात आली आहे. 

46
३. Bandhan Bank: व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा

बंधन बँकेनेही मोफत व्यवहारांच्या संख्येत बदल केले आहेत.

स्वतःच्या बँकेचे ATM: दरमहा ५ मोफत आर्थिक व्यवहार (Financial Transactions).

दुसऱ्या बँकेचे ATM: मेट्रो शहरांत ३ आणि इतर शहरांत ५ मोफत व्यवहार.

विशेष सवलत: नॉन-फायनन्शिअल ट्रान्झॅक्शन (उदा. बॅलेन्स चेक) सध्या अमर्यादित राहतील. 

56
चार्जेस टाळण्यासाठी ग्राहकांनी काय करावे?

आरबीआयच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँकांनी हे बदल केले असून, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा उद्देश आहे. अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

डिजिटल पेमेंट: शक्य तिथे UPI, नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपचा वापर करा.

कॅश प्लॅनिंग: महिन्याला किती रोख रक्कम लागेल याचे नियोजन करून एकाच वेळी मोठी रक्कम काढा, जेणेकरून व्यवहारांची संख्या वाढणार नाही.

मेट्रो vs नॉन-मेट्रो: तुम्ही कोणत्या शहरात एटीएम वापरत आहात, त्यानुसार फ्री लिमिट लक्षात ठेवा. 

66
महत्त्वाची टीप

हे नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होत आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला किंवा जवळच्या शाखेला नक्की भेट द्या.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories