Navpancham Rajyoga 2026: ज्योतिषशास्त्रानुसार गुरू हा ज्ञान, भाग्य, संपत्ती, विवाह आणि संततीचा कारक ग्रह मानला जातो. सध्या गुरू मिथुन राशीत आणि सूर्य कुंभ राशीत आहे, ज्यामुळे हा अत्यंत शुभ योग तयार होत आहे.
होळीचा उत्साह ओसरताच ज्योतिषशास्त्रात एक मोठा आणि शक्तिशाली 'नवपंचम राजयोग' तयार होत आहे. सूर्य आणि गुरू यांच्यात १२० अंशांचा कोन तयार झाल्यामुळे हा विशेष योग बनतो. ५ मार्च २०२६ रोजी रात्री १०:४१ पासून हा योग सुरू होईल. गुरू मिथुन राशीत आणि सूर्य कुंभ राशीत असल्यामुळे तयार होणारा हा योग करिअर, पैसा आणि सन्मानात वाढ होण्याचे संकेत देत आहे.
24
मिथुन (Gemini)
या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवतील, बढती देतील किंवा तुमची प्रशंसा करतील. तुम्ही व्यवसायात नवीन शाखा उघडू शकता किंवा गुंतवणुकीत मोठा फायदा मिळवू शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. कौटुंबिक संबंधातही शांतता आणि सलोखा राहील.
34
सिंह (Leo)
तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनेल आणि महत्त्वाच्या लोकांशी तुमच्या ओळखी होतील. खूप दिवसांपासून थांबलेली नोकरीची संधी किंवा परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होईल. व्यवसायातील भागीदारीत तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्न वाढेल आणि गुंतवणुकीतून फायदा होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल आणि आरोग्यही चांगले राहील.
तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, विशेषतः वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जमिनीतून फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यवसायात मोठे सौदे किंवा नवीन प्रोजेक्ट्स तुमच्याकडे येतील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. नियमित दिनचर्या पाळल्यास तुमचे आरोग्यही सुधारेल.