मुंबई - इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १८,०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदिच्या दरात चढ-उतार बघायला मिळथ आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या.
इराण आणि इस्रायलमधील संघर्षाचा जागतिक बाजारपेठेवर थेट परिणाम होत आहे. दोन्ही देशांमधील संघर्षामुळे सोन्याचे दर घसरत आहेत. गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १८,००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.
27
मंगळवारी १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात १३५ रुपयांची घसरण
भारतात मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सततच्या वाढीमुळे चिंतेत असलेल्या लोकांना दिलासा मिळाला. मंगळवारी १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात १३५ रुपयांची घसरण झाली होती. आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,७०० रुपयांची घसरण झाली आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर किती आहेत ते पाहूया.