एसी लोकलचे आगमन आणि एक्स्प्रेसचा हस्तक्षेप यामुळे सामान्य मुंबईकर प्रचंड वैतागला होता. प्रवाशांच्या वाढत्या रोषानंतर रेल्वे प्रशासनाने हा 'प्रायोगिक' बदल केला आहे.
प्राधान्य लोकलला: आता सकाळी ८ ते ११ या वेळेत फक्त लोकल गाड्यांना 'ग्रीन सिग्नल' असेल.
प्रवाशांची मागणी मान्य: एक्सप्रेसच्या क्रॉसिंगमुळे होणारा खोळंबा आता कमी होणार आहे.
शिस्तबद्ध वेळापत्रक: यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या गाड्या वेळेवर पोहोचण्यास मदत होईल.
रेल्वेच्या या नव्या प्रयोगामुळे उद्यापासून मुंबईकरांचा सकाळचा प्रवास अधिक सुसह्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.