सर्वात महाग भाज्या: १ लाख रुपये किलो दराने भाजी विकली जाते. वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरयं. भारतात १ लाख रुपये किलो हॉप शूट्स आणि ४० हजार रुपयांना गुच्छी मशरूमची विक्री होते ? या भाज्या इतक्या महाग का आहेत? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
किलो भाजीची किंमत १ लाख रुपये.. सोन्यापेक्षा महागड्या या पिकाबद्दल माहिती आहे का?
आपण बाजारात गेल्यावर भाज्यांचे भाव थोडे वाढले तरी चिंता करतो. पण, तुम्ही कधी कल्पना केली आहे का की, एखाद्या भाजीची किंमत लाखांमध्ये असू शकते? भारतात हॉप शूट्स आणि गुच्छी मशरूम या सर्वात महागड्या भाज्या आहेत.
26
हॉप शूट्स: एक लाख रुपये किमतीचे दुर्मिळ पीक
भारतातील सर्वात महाग भाजी म्हणून हॉप शूट्स ओळखली जाते. सध्या भारतीय बाजारात या भाजीची किंमत प्रति किलो ८५,००० ते १,००,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. एवढी मोठी किंमत असल्यामुळे सामान्य माणसाला ही भाजी खरेदी करणे जवळजवळ अशक्य आहे. या भाजीची किंमत महागडी फळे, मिठाई आणि सोन्याच्या किमतीएवढी किंवा त्याहूनही जास्त आहे हे विशेष.
लोक सहसा महागडी गॅजेट्स, दागिने किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्यास उत्सुक असतात. पण फक्त स्वयंपाकासाठी एवढी महाग भाजी कोण विकत घेईल, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र, किंमत कितीही जास्त असली तरी, तिची मागणी अजिबात कमी झालेली नाही. देशात खूप कमी घरांमध्येच ही भाजी शिजवली जाते, पण बाजारात तिला प्रचंड मागणी आहे.
36
हॉप शूट्सची लागवड पद्धत आणि मुख्य उत्पादक क्षेत्रे
हे दुर्मिळ हॉप शूट्स पीक बिहारमधील औरंगाबाद आणि हिमाचल प्रदेशातील किन्नौर भागात घेतले जाते. याच्या वाढीसाठी थंड हवामान आणि विशिष्ट माती आवश्यक असते. याची लागवड करणे आव्हानात्मक असल्याने उत्पादन मर्यादित असते.
हॉप शूट्स महाग असण्याचे कारण म्हणजे त्याचे औषधी गुणधर्म. याचा उपयोग औषधे बनवण्यासाठी होतो आणि ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते. याची काढणी हातानेच करावी लागते, त्यामुळे श्रम आणि वेळ जास्त लागतो.
56
गुच्छी मशरूम: हिमालयात उगवणारे एक आश्चर्य
हॉप शूट्सनंतर गुच्छी मशरूम ही भारतातील दुसरी सर्वात महाग भाजी आहे. याची किंमत प्रति किलो ३०,००० ते ४०,००० रुपये आहे. हे मशरूम नैसर्गिकरित्या हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात उगवतात.
66
जंगलातून गुच्छी मशरूम गोळा करणे हे एक कठीण काम
गुच्छी मशरूम गोळा करणे खूप कठीण काम आहे. हे घनदाट जंगलात, ओलसर मातीत वाढतात. त्यांना शोधणे सोपे नसते. कृत्रिम लागवड अशक्य असल्याने, जंगलातून गोळा केलेले मशरूमच बाजारात विकले जातात.