
Mangalsutra Design in Gold with Price: भारतीय महिलांसाठी सोन्याचे दागिने खूप महत्त्वाचे असतात. पण सोन्याचे वाढते भाव बघता मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सोनं खरेदी करणं बजेटच्या बाहेर गेलं आहे. तुम्हालाही स्वतःसाठी सोन्याची चेन किंवा मंगळसूत्र घ्यायचं असेल, पण बजेटमुळे प्लॅन पुढे ढकलत असाल, तर काही स्मार्ट पर्याय तुमच्यासाठी आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी मिनिमलिस्टिक स्टाईलचे नवीन मंगळसूत्र डिझाइन्स घेऊन आलो आहोत. हे डिझाइन्स तुम्ही रोजच्या वापरासाठी, ऑफिसमध्ये किंवा अगदी लग्न-पार्टीमध्येही घालू शकता. विशेष म्हणजे, हे पॅटर्न खूप मॉडर्न आहेत, जे तुम्हाला सौभाग्याचं लेणं आणि स्टायलिश चेन, दोन्हीचा फिल देतील.
मिनिमल ज्वेलरी साधी आणि आकर्षक दिसते, शिवाय एक वेगळाच आत्मविश्वास देते. फोटोमधलं हे मंगळसूत्र मॉडर्न आणि स्वतंत्र विचारांच्या महिलांसाठी खास बनवलं आहे. हे डिझाइन म्हणजे परंपरा आणि फ्युजनचा उत्तम मिलाफ आहे. यात सोन्यासोबत काळ्या मण्यांचा वापर केला आहे आणि सोबत डायमंड स्टडेड कॉकटेल पेंडेंट खूपच ट्रेंडी दिसतं. तुम्ही हे कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटसोबत सहज घालू शकता. जे महिला फॉर्मल लूक किंवा ऑफ-शोल्डर ड्रेस जास्त घालतात, त्यांच्यासाठी हे डिझाइन खास आहे. 22 कॅरेट सोन्यात हे खूप महाग पडेल, पण तुम्ही 14-18 कॅरेटमध्ये हे डिझाइन ₹15,000 ते ₹35,000 पर्यंत बनवून घेऊ शकता.
ज्या विवाहित महिलांना सिंपल आणि एलिगेंट लूक आवडतो, त्यांच्यासाठी हे मॉडर्न डिझाइन परफेक्ट आहे. यात जड पेंडेंट किंवा चेनऐवजी एक नाजूक बार चेन आणि काळे मणी वापरले आहेत, ज्यामुळे एक सोफिस्टिकेटेड लूक मिळतो. याचा स्लीक लूक अगदी नेकलेससारखा दिसतो. जर तुम्हाला एकाच वेळी जास्त दागिने घालायला आवडत नसतील, तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही हे एकटं किंवा लांब चेनसोबत घालून सुंदर दिसू शकता. हे मंगळसूत्र तुम्हाला सोन्यात ₹12,000 ते ₹25,000 पर्यंत मिळेल. अर्थात, 22 कॅरेट सोनं निवडल्यास किंमत आणखी वाढू शकते.
या फोटोमध्ये डायमंड आणि सोन्याच्या मंगळसूत्राचे मॉडर्न डिझाइन्स दिसत आहेत, जे पारंपरिक डिझाइनला एक स्टायलिश मेकओव्हर देत आहेत. या डिझाइनची खासियत म्हणजे मिनिमलिस्टिक गोल्ड चेन, ज्यावर काळ्या मण्यांचं नाजूक काम केलेलं आहे. हे रोज घालण्यासाठी खूप सोपे आहेत. हार्ट आणि राऊंड शेपचे पेंडेंट तुम्हाला महागड्या नेकलेसचा फिल देतात. जर तुम्हाला व्हर्सटाईल लूक आवडत असेल, तर हा पर्याय तुमच्यासाठीच आहे. हे डिझाइन साधेपणा आणि स्टेटस यात उत्तम संतुलन साधतं. तुम्ही हे मंगळसूत्र पांढऱ्या शर्ट किंवा ब्लेझरसोबत घालू शकता. तर लग्न समारंभात लांब चेनसोबत पेअर करून मॉडर्न ट्विस्ट देऊ शकता.