Mobile Market: विजय सेल्सने 'ॲपल डेज सेल' जाहीर केला आहे. या खास सेलमध्ये मॅकबुक, आयपॅड आणि आयफोनवर बँक ऑफर्स, डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस मिळत आहेत. हा सेल 16 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
विजय सेल्सच्या ॲपल डेज सेलमध्ये ॲक्सिस, आयसीआयसीआय आणि एसबीआय कार्डधारकांना 7,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. निवडक गॅजेट्सवर 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचीही संधी आहे.
27
इन्स्टंट डिस्काउंट
आयफोन 17 ची मूळ किंमत 78,790 रुपये आहे. यावर 3,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळत असल्याने, त्याची किंमत 75,790 रुपये होईल. यावरही 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.
37
आयफोन 17e
आयफोन 17e ची किंमत 60,490 रुपये आहे. 3,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला 57,490 रुपयांना मिळेल. या मॉडेलवरही 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस लागू आहे.
आयफोन 17 प्रोची मूळ किंमत 1,28,190 रुपये आहे. पण 4,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटमुळे तुम्ही तो 1,24,190 रुपयांना खरेदी करू शकता. यावरही 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे.
57
आयफोन 17 प्रो मॅक्स
आयफोन 17 प्रो मॅक्सची मूळ किंमत 1,42,390 रुपये आहे. 4,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटनंतर याची किंमत 1,38,390 रुपये होते. यावरही 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.
67
आयफोन एअर
आयफोन एअरची किंमत 94,990 रुपये आहे. पण 4,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटमुळे याची किंमत 90,990 रुपये होईल. 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळाल्यास मोठा फायदा होऊ शकतो.
77
जुन्या मॉडेल्सवरही मोठी सूट
जुन्या मॉडेल्सवरही मोठी सूट. आयफोन 16 आता 64,490 रुपयांना, आयफोन 16 प्लस 71,490 रुपयांना, आयफोन 16e 53,690 रुपयांना आणि आयफोन 15 मॉडेल 54,900 रुपयांना इन्स्टंट डिस्काउंटनंतर खरेदी करता येईल.