आजकाल 'डोपामाइन डेकोर' (Dopamine Decor) हा ट्रेंड खूप गाजतोय. याचा अर्थ असा की, असं डेकोरेशन जे तुमचा मूड एकदम मस्त करेल, घरात एक नवी ऊर्जा आणेल आणि पॉझिटिव्ह वाईब्स पसरवेल. या ७ आयडिया नक्की ट्राय करून बघा.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण तणावाखाली जगतोय. या उदास आयुष्यात आनंदाचे काही क्षण मिळावेत, असं प्रत्येकाला वाटतं आणि यात घराच्या सजावटीचा मोठा वाटा असतो. याच कारणामुळे 'डोपामाइन डेकोर'चा ट्रेंड खूप वाढतोय. लोक आता बोल्ड पेंट आणि आकर्षक पॅटर्न असलेल्या इंटीरियर डिझाइनकडे वळत आहेत. कारण या गोष्टी पाहिल्या की डोपामाइन हार्मोन वाढतो आणि आपल्याला छान वाटतं. चला तर मग, पाहूया की तुम्ही तुमच्या घरात अशा कोणत्या चमकदार आणि अनोख्या वस्तू वापरून आनंद वाढवू शकता.
28
ब्राइट कलरचा वापर करा
सॉफ्ट रंगांऐवजी भडक रंगांचा वापर केल्यास डोपामाइन हार्मोन वाढतो. तुम्ही तुमच्या घरात पिवळा, गुलाबी, नारंगी किंवा निळ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश करा. हे रंग तुमचा मूड लगेच सुधारतात आणि घरात एक प्रकारची ऊर्जा आणतात. तुम्ही भडक रंगाचं कपाट बनवू शकता किंवा कुशन कव्हरसाठी ब्राईट रंग निवडू शकता.
38
वॉल आर्ट आणि पर्सनल फोटो लावा
भिंती सजवण्यासाठी वॉल आर्ट किंवा तुमचे पर्सनल फोटो नक्की वापरा. जेव्हा तुम्ही भिंतीवर भडक रंगांचे फोटो किंवा मोटिवेशनल आर्ट लावता, तेव्हा ते तुमचं लक्ष वेधून घेतं आणि डोपामाइन हार्मोन रिलीज होतो. हे पाहून तुम्हाला आनंद होतो, एक भावनिक नातं तयार होतं आणि पॉझिटिव्ह फिलिंग येते.
घरामध्ये इनडोअर प्लांट्स नक्की लावा. ही झाडं केवळ खोलीला हिरवागार लुक देत नाहीत, तर तुमच्या मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम करतात. छोट्या-छोट्या रोपांमुळेही घरात मोठा आणि सकारात्मक बदल घडून येतो.
58
कलरफुल कारपेट आणि कुशचा वापर
तुम्ही भडक रंगांचे कार्पेट आणि कुशन वापरूनही घराला एक सुंदर लुक देऊ शकता. एक रंगीबेरंगी कार्पेट तुमच्या लिव्हिंग रूमचा पूर्ण चेहरामोहरा बदलू शकतं. त्याचप्रमाणे, साध्या सोफ्याचा लुक रंगीत कुशनमुळे एकदम बदलून जातो.
68
कलरफुल किचन
किचन ही एक अशी जागा आहे, जिथे तुम्ही जे काही बनवता त्याचा थेट संबंध तुमच्या मनाशी असतो. त्यामुळे डोपामाइन हार्मोन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या किचनला कलरफुल लुक देऊ शकता. तुम्ही किचन कॅबिनेटसाठी ब्राईट रंग निवडू शकता किंवा रंगीत फ्रिज घेऊ शकता. किचनमधील एखादी-दुसरी भडक रंगाची वस्तूही संपूर्ण स्वयंपाकघराचा लुक बदलून टाकते.
78
सेंटेड कॅंडल आणि लाइटिंगने वातावरण बनवा
सॉफ्ट लाइटिंग, फेरी लाइट्स आणि सुगंधी मेणबत्त्या तुमच्या घराला आरामदायक आणि शांत बनवतात. यामुळे तणाव कमी करायलाही मदत होते.
88
क्यूट आणि यूनिक डेकोर पीस ठेवा
छोट्या-छोट्या क्युट शोपीस, फंकी वस्तू किंवा तुम्ही स्वतः बनवलेल्या (DIY) डेकोरेशनच्या वस्तू तुमच्या घराला एक वेगळं व्यक्तिमत्व देतात. या वस्तूंना प्रत्येक वेळी पाहिल्यावर चेहऱ्यावर एक स्माईल येते.