Mobile Market: जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक चांगला 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर मोटोरोला मोटो जी37 5G तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आकर्षक डिझाइन, दमदार प्रोसेसर आणि मोठी बॅटरी यांसारख्या फीचर्समुळे हा फोन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
या फोनमध्ये 6.67 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव खूपच स्मूथ होतो. हा डिस्प्ले 1050 निट्सपर्यंत ब्राईटनेस देतो, ज्यामुळे कडक उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. याशिवाय, कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनमुळे स्क्रीनला अधिक चांगली सुरक्षा मिळते.
25
दमदार परफॉर्मन्ससाठी खास प्रोसेसर
या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट वापरला आहे. यात 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB UFS 2.2 स्टोरेज आहे. रोजची कामं, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि मल्टीटास्किंग यांसारखी कामं हा फोन सहज हाताळतो. गरज पडल्यास, मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. या फोनची मूळ किंमत 24,999 रुपये आहे, पण 38% डिस्काउंटनंतर तो 15,379 रुपयांना मिळत आहे. सोबतच, काही विशिष्ट बँक क्रेडिट कार्ड्सवर 1000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूटही मिळू शकते.
35
फोटो आणि व्हिडिओसाठी उत्तम कॅमेरा
फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. PDAF सपोर्टमुळे फोकस वेगाने काम करतो. तुम्ही यातून 2K व्हिडिओ रेकॉर्डिंगही करू शकता. सेल्फीसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा व्हिडिओ कॉल्स, सोशल मीडियासाठी फोटो आणि 2K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी उपयुक्त आहे.
या फोनमध्ये 5200mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. सामान्य वापरात ही बॅटरी दिवसभर बॅकअप देईल, अशाप्रकारे कंपनीने हा फोन डिझाइन केला आहे. २०W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे तो लवकर चार्ज होतो. तसेच, 6W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग फीचरद्वारे तुम्ही इतर डिव्हाइसदेखील चार्ज करू शकता.
55
आणखी काय काय आहे खास?
मोटोरोला मोटो जी37 5G मध्ये IP64 डस्ट आणि वॉटर स्प्लॅश प्रोटेक्शन आहे. MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशनमुळे हा फोन सामान्य वापरात अधिक टिकाऊ ठरतो. यात साइड फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी अॅटमॉस स्टीरिओ स्पीकर, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.4 आणि वाय-फाय 5 सारखे फीचर्स आहेत. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित मोटो हॅलो यूआय (Moto Hello UI) सह येतो. कंपनीने सांगितले आहे की, भविष्यात अँड्रॉइड 17 चे अपडेट आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स दिले जातील.