मोबाइल आणि लॅपटॉपच्या किंमतीत होणार वाढ, वाचा कारण काय?

Published : Jun 23, 2026, 01:47 PM IST
amazon great freedom festival laptop under 30,000

सार

येत्या काळात तुम्ही एखादा नवा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण लवकरत मोबाइल आणि लॅपटॉपच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामागील कारण काय जाणून घेऊया सविस्तर...

Mumbai : सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI चा झपाट्याने वापर वाढला आहे. याचा परिणाम आता सर्वसामान्यांचा खिशावर होण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती आगामी काळात वाढू शकतात. यामागे काही कारणे आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

AI कंपन्यांच्या खरेदीमुळे फटका

चॅटबॉट्स आणि विविध AI मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात डेटा स्टोरेज व प्रोसेसिंगची गरज असते. यामुळे एआयच्या क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात मेमरी आणि स्टोरेज चिप्सची खरेदी करतात. या चिप्सचे उत्पादन प्रामुख्याने सॅमसंग (Samsung), एसके हायनिक्स (SK Hynix) आणि मायक्रॉन (Micron या तीन कंपन्यांकडून केले जाते. य कंपन्यांच्या वाढत्या मागणीमुळे सामान्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी आवश्यक असलेल्या चिप्सची कमतरता निर्माण झालीये. अशातच त्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

Apple कडूनही किंमतवाढीचे संकेत

Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आगामी MacBook, iPhone आणि iPad यांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली. गेल्या वर्षांच्या तुलनेत मेमरी चिप्सच्या किंमती चौपट वाढल्या आहेत. डेटा सेंटरमध्ये वापरल्या डाणाऱ्या एका चिपची किंमत 350 डॉलरवरुन 1300 डॉलरपर्यंत गेल्याचीह टिम कुक यांनी म्हटले.

Oppo, Vivo आणि Samsung चे नवीन फोन होणार महाग

स्मार्टफोन तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये मेमरी चिप्सचा वाटा सुमारे 8 ते 12 टक्के असतो. नोव्हेंबर 2025 पासून स्मार्टफोनच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही मॉडेल्सच्या किंमती दुपट्टीने वाढल्या गेल्या आहेत. Oppo आणि Vivo या कंपन्यांकडून भारतात नवे स्मार्टफोन सातत्याने लाँच केले जात आहेत. याशिवाय सॅमसंगच्या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रुपयाच्या घसरणीचा परिणाम

भारतामध्ये या चिप्सची खरेदी डॉलरमध्ये केली जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने कंपन्यांचा खर्च वाढत आहे. याचा भार अखेरीस ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

ATM Refund Rules : एटीएममधून पैसे आले नाहीत? रोज मिळतील १०० रुपये, जाणून घ्या नियम
BigFlix: भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता OTT प्लॅटफॉर्म! तुम्हाला माहितीये का ही गोष्ट?