सहसा भारतीय घरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर दररोज फक्त अन्न गरम करण्यासाठी केला जातो. तुम्हीही काहीतरी बेक करण्यासाठी किंवा केक बनवण्यासाठी, इत्यादी चविष्ट पदार्थ बनवण्यासाठीच मायक्रोवेव्ह वापरत असाल तर तुमच्यासाठी काही किचन हॅक्स आहेत. मास्टरशेफ पंकज भदौरिया (masterchefpankajbhadouria) म्हणतात की, मायक्रोवेव्हचा एक नव्हे तर दहा प्रकारे वापर करता येतो. आता तुम्हाला फक्त अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हवर अवलंबून राहावे लागणार नाही, दैनंदिन जीवनातही मायक्रोवेव्हचा वापर करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. तुम्हालाही हे हॅक्स माहीत असायला हवेत.