एमजी विंडसर ईव्ही (MG Windsor EV) घेण्याचा विचार करताय, पण Essence आणि Exclusive Pro या दोन व्हेरिएंटमध्ये कन्फ्युज आहात? बॅटरी, रेंज, डिझाइन, फीचर्स आणि किंमत यावर आधारित तुमच्यासाठी कोणतं मॉडेल बेस्ट आहे, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
मिड-साईज सेगमेंटमध्ये फॅमिली इलेक्ट्रिक कार म्हणून एमजी विंडसर ईव्ही एक चांगला पर्याय आहे. याची मोठी केबिन कुटुंबाला आकर्षित करते. पण अनेक व्हेरिएंट्स आणि बॅटरी पॅकमुळे योग्य मॉडेल निवडणं थोडं अवघड होऊन बसतं. चला हा गोंधळ दूर करूया.
28
विंडसर एसेंस एक्सक्लुझिव्ह प्रो व्हेरिएंट्स
जर तुम्ही नवीन विंडसर ईव्ही घेण्याचा विचार करत असाल आणि Essence व Exclusive Pro या व्हेरिएंट्समध्ये गोंधळला असाल, तर काळजी करू नका. या दोन्ही व्हेरिएंट्सची तुलना करून तुमच्यासाठी काय चांगलं आहे ते पाहूया.
38
दोन व्हेरिएंट्समधील फरक
विंडसर Essence आणि विंडसर Exclusive Pro यातील मुख्य फरक बॅटरी क्षमतेचा आहे. Essence व्हेरिएंटमध्ये 38 kWh क्षमतेची बॅटरी आहे, तर Exclusive Pro व्हेरिएंट 52.9 kWh क्षमतेच्या मोठ्या बॅटरी पॅकसह येतो. त्यामुळे दोन्ही गाड्यांच्या रेंजमध्ये मोठा फरक पडतो.
लहान 38 kWh बॅटरीमुळे विंडसर Essence एका चार्जमध्ये 332 किलोमीटरपर्यंत धावते. तर, 52.9 kWh च्या मोठ्या बॅटरीमुळे Exclusive Pro एका चार्जमध्ये तब्बल 449 किलोमीटरची रेंज देते. बाहेरील डिझाइन आणि इतर फीचर्समध्येही फरक आहेत, पण बॅटरी हा सर्वात मोठा मुद्दा आहे.
58
डिझाइनमधील फरक
दोन्ही मॉडेल्सच्या डिझाइनमधील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांचे 18-इंचाचे अलॉय व्हील्स. Essence मध्ये डायमंड-कट अलॉय व्हील्स मिळतात, तर Exclusive Pro मध्ये ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आहेत. दुसरा मोठा बदल म्हणजे इंटीरियर. स्टँडर्ड विंडसरमध्ये (Essence) नाईट ब्लॅक इंटीरियर आहे, तर प्रो मॉडेलमध्ये नवीन ड्युअल-टोन आयव्हरी व्हाईट इंटीरियर मिळतं.
68
जास्त रेंज तुमची प्राथमिकता असेल तर
Essence व्हेरिएंटमध्ये PM2.5 एअर फिल्टर, इन्फिनिटी व्ह्यू ग्लास रूफ आणि अँबियंट लायटिंगसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात, जे Exclusive Pro व्हेरिएंटमध्ये नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला जास्त रेंज हवी असेल, तर तुम्हाला Exclusive Pro निवडावा लागेल, पण मग या खास फीचर्सवर पाणी सोडावं लागेल.
78
किंमत
किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, विंडसर Essence व्हेरिएंटची किंमत 16.52 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर Exclusive Pro व्हेरिएंटसाठी 17.37 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतील. म्हणजेच, 85,000 रुपये जास्त दिल्यास तुम्हाला 52.9 kWh क्षमतेची मोठी बॅटरी मिळते.
88
विंडसर एसेंस खरेदी केल्यास
जास्त पैसे देऊन मोठी बॅटरी असलेला Exclusive Pro घेणे लाँग टर्मसाठी फायद्याचं वाटू शकतं. पण जर तुम्ही दुसरी किंवा तिसरी इलेक्ट्रिक गाडी म्हणून विचार करत असाल, तर कमी किमतीत चांगले फीचर्स देणारी विंडसर Essence तुमच्या बहुतेक गरजा पूर्ण करते. त्यामुळे तुमचा वापर किती आहे, यावर निर्णय अवलंबून आहे.