Woman Selling Peanuts : स्टेशनवर शेंगदाणे विकणाऱ्या आजींची एकच चर्चा, कमाई किती?

Published : Aug 27, 2026, 04:49 PM IST

गदग रेल्वे स्टेशन : कर्नाटकातल्या बेटागेरी येथील तिप्पम्मा आजी गेल्या 30 वर्षांपासून गदग रेल्वे स्टेशनवर शेंगदाणे आणि भाजके चणे विकत आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि आजही त्या स्वाभिमानाने काम करत आहेत.

PREV
15
शेंगदाणे, भाजके चणे, वाटाणे विकणाऱ्या आजींची कहाणी

गदग मार्गावरून जाताना या आजी दिसतात. प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या पायऱ्यांजवळ बसून त्या शेंगदाणे, भाजके चणे, वाटाणे आणि सूर्यफुलाच्या बिया विकतात. सध्या या आजींची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जाणून घ्या आजी कोण आहेत आणि त्यांची रोजची कमाई किती आहे?

25
बेटागेरीच्या रहिवासी तिप्पम्मा आजी
या आजींचं नाव तिप्पम्मा असून त्या बेटागेरीच्या रहिवासी आहेत. गेल्या तीस वर्षांपासून त्या गदग रेल्वे स्टेशन परिसरात हा व्यवसाय करत आहेत. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी तिप्पम्मा यांच्यावर आली. तेव्हा गावात मजुरी करून दिवसाला फक्त २५ ते ५० पैसे मिळायचे. एवढ्या पैशात मुलांचं पोट भरणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी गावातील एका महिलेच्या मदतीने व्यवसायासाठी गदग शहर गाठलं.
35
व्यवसायासाठी मिळालं प्रोत्साहन
व्यवसाय सुरू केल्यावर गावचे लोक काय म्हणतील याची भीती होती. 'एकदा आमच्या गावचे एक ज्येष्ठ गृहस्थ इथे आले. त्यांना पाहून मी घाबरले आणि आपलं सामान घेऊन एका कोपऱ्यात बसले. पण ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, 'का घाबरतेस? तू प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेस.' त्यांनी मला व्यवसाय चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तेव्हापासून मी धैर्याने व्यवसाय करत आहे,' असं तिप्पम्मा आजी सांगतात.
45
दिवसाला २०० ते ३०० रुपयांची कमाई
सुमारे ७५ ते ८० वर्षांच्या तिप्पम्मा आजी आजही हा व्यवसाय करतात. यातून त्या दिवसाला २०० ते ३०० रुपये कमावतात. त्यांचा नातू त्यांना रोज स्टेशनवर आणून सोडतो आणि संध्याकाळी परत घरी घेऊन जातो. 'नातवंडं, सून सगळे चांगले आहेत. घरी रिकामं बसण्यापेक्षा इथे येऊन व्यवसाय करते,' असं आजी सांगतात.
55
झोपेतच मृत्यू यावा हीच इच्छा

रेल्वे स्टेशनवर परवानगीशिवाय व्यवसाय करता येत नाही. तरीही गदग रेल्वे स्टेशनच्या पोलिसांनी तिप्पम्मा आजींना कधीही त्रास दिला नाही. 'या व्यवसायातून मी काही संपत्ती जमवली नाही. पण मुला-नातवंडांना शिकवलं. माझा नातूच बाजारात जाऊन हा सगळा माल घेऊन येतो. सून सकाळी डबा करून देते. माझा एकुलता एक मुलगाही वारला. आता झोपेतच मृत्यू यावा, हीच माझी शेवटची इच्छा आहे,' असं तिप्पम्मा आजी सांगतात.

Read more Photos on

Recommended Stories