
मारुती सुझुकीने त्यांची प्रीमियम हॅचबॅक बलेनो आता अधिक परवडणारी बनवली आहे. अलीकडेच लागू झालेल्या जीएसटी २.० दरातील कपातचा थेट फायदा आता ग्राहकांना मिळणार आहे. या बदलामुळे बलेनोच्या किमतीत सुमारे ८.५ टक्के घट होईल. जीएसटी कपात झाल्यानंतर मारुती सुझुकीची बलेनो किती स्वस्त होईल ते पाहूया.
मारुती बलेनोची सर्वात मोठी किंमत कपात अल्फा पेट्रोल-ऑटोमॅटिक प्रकारात मिळते. आता ही किंमत सुमारे ८४,९०० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. हा फायदा प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये ऑटोमॅटिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आकर्षक ठरतो.
बलेनोमध्ये १.२ लिटर, चार सिलिंडर K12N पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८३ bhp पॉवर निर्माण करते. दुसरा पर्याय १.२ लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे, जे ९० bhp पॉवर निर्माण करते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. बलेनो सीएनजीमध्ये १.२ लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे. हे ७८ps पॉवर आणि ९९nm पीक टॉर्क निर्माण करते.
बलेनो कारची लांबी ३९९० मिमी, रुंदी १७४५ मिमी, उंची १५०० मिमी आणि व्हीलबेस २५२० मिमी आहे. नवीन बलेनोचे एसी व्हेंट्स पुन्हा डिझाइन केले आहेत. फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. या प्रीमियम हॅचबॅकमध्ये ३६० डिग्री कॅमेरा मिळेल. ९ इंच स्मार्टप्ले प्रो प्लस टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. हे इन्फोटेनमेंट सिस्टिम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करते.
मारुती बलेनोमध्ये आता ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-स्टार्ट असिस्ट, ३६०-डिग्री कॅमेरा, EBD सह ABS, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज, रिव्हर्सिंग कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर अशी वैशिष्ट्ये मिळतात. भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये बलेनोला चार स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा अशा चार प्रकारांमध्ये बलेनोची विक्री होते. मारुती सुझुकी बलेनोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ६.७० लाख रुपये आहे. जीएसटी कपातीनंतर, मारुती बलेनो ही केवळ वैशिष्ट्यपूर्ण आणि स्टायलिश कारच नाही तर अधिक परवडणारीही झाली आहे. मारुतीची ही प्रीमियम हॅचबॅक आता ह्युंदाई i20 आणि टाटा अल्ट्रोजसारख्या कारना तीव्र स्पर्धा देईल.