
मुंबई : अमेझॉन इंडिया आपला सर्वात मोठा शॉपिंग महोत्सव “ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२५” येत्या २३ सप्टेंबरपासून सुरू करत आहे. खास बाब म्हणजे प्राइम सदस्यांना या सेलचा लाभ २४ तास आधी म्हणजेच २२ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच घेता येणार आहे. यंदाच्या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ब्युटी प्रोडक्ट्स आणि घरगुती वस्तूंवर भन्नाट ऑफर्स असणार आहेत. यासोबतच एसबीआय कार्ड धारकांना अतिरिक्त सवलती, जलद डिलिव्हरी नेटवर्क आणि एआय-संचालित खरेदीचा अनुभव मिळणार आहे.
विक्रेत्यांचा विक्रमी सहभाग आणि जलद डिलिव्हरी
यावर्षीच्या सेलमध्ये तब्बल १७ लाखांहून अधिक विक्रेते सहभागी होत आहेत. ग्राहकांपर्यंत जलद डिलिव्हरी पोहोचावी म्हणून अमेझॉनने टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये ४५ नवीन डिलिव्हरी स्टेशन उघडली आहेत. रायबरेली, बुलंदशहर, तिरुचिरापल्ली, पोर्ट ब्लेअर, श्रीनगर, रांची यांसारख्या ठिकाणी डिलिव्हरी स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. यामुळे देशभरातील ग्राहकांना अधिक वेगवान आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.
जबरदस्त ऑफर्स आणि नवीन लाँचेस
अमेझॉनने जाहीर केले आहे की ग्राहकांना १ लाखाहून अधिक उत्पादनांवर वर्षातील सर्वात कमी किंमती मिळतील. Apple, Samsung, OnePlus यांसारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन, LG, Samsung, Godrej यांसारख्या कंपन्यांची गृहउपकरणे आणि Sony, Xiaomi यांचे स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीत खरेदी करता येणार आहेत. याशिवाय फॅशन, ब्युटी, किचन आयटम्स, दैनंदिन गरजांची उत्पादने आणि लोकल शॉप्स, कारीगर व सहेली सारख्या प्रोग्रामअंतर्गत छोटे-मोठे व्यवसायही आकर्षक ऑफर्स घेऊन येत आहेत.
एआय-संचालित खरेदीचा अनुभव
यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये खरेदी आणखी सोपी करण्यासाठी अमेझॉनने एआय शॉपिंग असिस्टंट रुफस एआय सादर केला आहे. याच्या मदतीने ग्राहकांना उत्पादन तुलना, किंमत इतिहास, व्हिडिओ रिव्ह्यू आणि वैयक्तिक शिफारसी मिळतील. लेन्स एआयच्या मदतीने फक्त फोटो काढून तुम्ही ते उत्पादन थेट अमेझॉनवर शोधू शकता. तसेच, हजारो रिव्ह्यूंचे सारांश एका क्लिकवर मिळतील.
बँक ऑफर्स आणि पेमेंट सोल्यूशन्स
ग्राहकांना या फेस्टिव्हलमध्ये एसबीआय कार्डवर विशेष सवलती मिळतील. याशिवाय Amazon Pay Later वर ₹६०,००० पर्यंतचे इन्स्टंट क्रेडिट, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध आहेत. फ्लाइट्सवर १५% पर्यंत, हॉटेल्सवर ४०% पर्यंत आणि बस बुकिंगवर १५% पर्यंत सूट मिळणार आहे.