प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठवाड्याला रेल्वेची भेट! दिल्ली, चंदीगड आणि अमृतसरसाठी ३ विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Published : Jan 22, 2026, 04:06 PM IST

Marathwada To North India Trains : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय रेल्वेने मराठवाड्यातून दिल्ली, चंदीगड, अमृतसरसाठी गाड्यांची घोषणा केली. २३ ते २६ जानेवारी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांमुळे सचखंड एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होईल. 

PREV
16
प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठवाड्याला रेल्वेची भेट!

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. २३ ते २६ जानेवारी दरम्यान मराठवाड्यातून दिल्ली (हजरत निजामुद्दीन), चंदीगड आणि अमृतसर या शहरांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे 'सचखंड एक्स्प्रेस'वर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

26
विशेष गाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रक

१. दिल्ली (हजरत निजामुद्दीन) - नांदेड विशेष गाडी (०४४९४/०४४९३)

दिल्लीहून: २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता सुटेल.

नांदेडहून (परतीचा प्रवास): २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री ८:१० वाजता सुटेल.

संभाजीनगर वेळ: सकाळी १०:२० (दिल्लीहून येताना) आणि मध्यरात्री १२:१८ (नांदेडहून जाताना). 

36
२. चंदीगड - नांदेड विशेष गाडी (०४५२४/०४५२३)

चंदीगडहून: २३ आणि २४ जानेवारी रोजी पहाटे ५:४० वाजता सुटेल.

नांदेडहून (परतीचा प्रवास): २५ आणि २६ जानेवारी रोजी रात्री ९:०० वाजता सुटेल.

संभाजीनगर वेळ: सकाळी ८:१५ (चंदीगडहून येताना) आणि मध्यरात्री १:१५ (नांदेडहून जाताना). 

46
३. अमृतसर - चेरलापल्ली विशेष गाडी (०४५४२/०४६४२)

अमृतसरहून: २३ जानेवारी रोजी पहाटे ३:५५ वाजता सुटेल.

चेरलापल्लीहून (परतीचा प्रवास): २५ आणि २६ जानेवारी रोजी दुपारी ३:४० वाजता सुटेल.

संभाजीनगर वेळ: दुपारी २:१५ (अमृतसरहून येताना) आणि पहाटे ३:४० (चेरलापल्लीहून येताना). 

56
प्रवाशांची 'बोळवण' की दिलासा?

मराठवाड्यातून दिल्लीसाठी स्वतंत्र आणि नियमित रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या केवळ सचखंड एक्स्प्रेसवरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नियमित गाडी सुरू करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने केवळ 'विशेष' गाड्या जाहीर केल्याने प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

66
महत्त्वाची सूचना

या गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी अधिकृत रेल्वे वेबसाइट किंवा ॲपचा वापर करावा, जेणेकरून प्रवासात अडचण येणार नाही.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories