How to make soft chapati: कोणताही खर्च किंवा जास्त मेहनत न करता, फक्त एक गोष्ट वापरून तुम्ही पीठ मळण्याची प्रक्रिया सोपी करू शकता. ही जबरदस्त ट्रिक कोणती आहे? आणि मऊ चपात्या कशा बनवायच्या हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा...
चपाती मऊ होण्यासाठी पीठ योग्य प्रकारे मळणे महत्त्वाचे आहे. पण अनेकजण याला कंटाळतात. आता लोण्यासारख्या मऊ चपात्या बनवण्यासाठी एक सोपी किचन हॅक आहे. ही ट्रिक तुमची मेहनत वाचवेल.
*एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ मिसळा. *नंतर पिठात थोडे-थोडे गरम पाणी घाला. *पीठ गरम असल्याने चमच्याने मिसळा. पीठ एकत्र झाल्यावर थंड होऊ द्या. *थंड झाल्यावर तेल घालून हलके मळा.
मळलेले पीठ सुमारे 20 मिनिटे झाकून ठेवा. नंतर त्याचे छोटे गोळे बनवा. पोळपाटावर गोल लाटा आणि नेहमीप्रमाणे तव्यावर दोन्ही बाजूंनी चपाती व्यवस्थित भाजून घ्या.
55
ही आहे मऊ चपातीची सीक्रेट टीप
या पद्धतीमधील मुख्य टीप म्हणजे गरम पाण्याचा वापर. गरम पाण्यामुळे पिठातील स्टार्च तुटतो. यामुळे पीठ मळायला सोपे जाते. या तंत्रामुळे चपात्या मऊ आणि लुसलुशीत होतात.