Mahindra BE6 Electric Ride On Car For Kids : महिंद्राने आपल्या BE6 फॉर्म्युला E एडिशन कारच्या डिझाइनवर आधारित मुलांसाठी एक नवीन इलेक्ट्रिक राईड-ऑन कार लाँच केली आहे. ही कार रिमोट कंट्रोल, ब्लूटूथ ऑडिओ सिस्टीम आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते.
महिंद्रा नेहमीच कारप्रेमींचा आवडता ब्रँड राहिला आहे. मोठ्या एसयूव्ही (SUV), स्पेशल एडिशनसोबतच कंपनी मुलांसाठी राईड-ऑन कार्ससुद्धा लाँच करत असते. याच रांगेत, नुकत्याच लाँच झालेल्या BE6 फॉर्म्युला E एडिशनच्या डिझाइनवर आधारित एक नवीन इलेक्ट्रिक राईड-ऑन कार सादर करण्यात आली आहे. मुलांच्या खेळण्यासाठी असलेली ही BE6 राईड-ऑन कार पहिल्या नजरेतच आपल्या खास डिझाइनमुळे लक्ष वेधून घेते.
या कारच्या बाहेरील डिझाइनमध्ये BE6 फॉर्म्युला E कार मॉडेलप्रमाणे LED हेडलाइट्स आणि रिअर लाइट्स दिले आहेत. तिचे दरवाजे उघडता येतात, ज्यामुळे मुलांना सहजपणे आत बसता येते आणि बाहेर पडता येते. कारच्या आतमध्ये खऱ्या कारसारखा दिसणारा फॉक्स इन्स्ट्रूमेंटल पॅनलही देण्यात आला आहे. यामुळे मुलांना 'ड्रायव्हिंग'चा अनुभव खेळासारखा न वाटता एका खऱ्या साहसासारखा वाटेल.
22
मुलांसाठी राईड-ऑन कार
या राईड-ऑन कारमध्ये ऑडिओ सिस्टीमसुद्धा आहे. गाणी ऐकण्यासाठी ब्लूटूथद्वारे मोबाईल कनेक्ट करता येतो. यामध्ये एक मोठी सिंगल सीट दिली आहे, ज्यामुळे मूल आरामात बसू शकते. सुरक्षेसाठी सीट बेल्टची सुविधाही देण्यात आली आहे. लहान रिचार्जेबल बॅटरीवर चालणारी ही कार मूल स्वतः चालवू शकते, तसेच पालक रिमोट कंट्रोलनेही ती चालवू शकतात.
थोडक्यात, मुलांसाठी स्पोर्टी, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण राईड-ऑन कार शोधणाऱ्यांसाठी महिंद्राची ही BE6 फॉर्म्युला E एडिशन एक उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत १८,००० रुपये ठेवण्यात आली आहे. बुकिंग सुरू झाले असून, वितरण पुढील वर्षापासून सुरू होईल, असे कंपनीने सांगितले आहे.