
Mahapareshan Bharti 2025: महापारेषण पुणे (Maharashtra State Electricity Transmission Company Ltd - MSETCL) अंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती जाहीर झाली आहे. १०वी उत्तीर्ण आणि ITI केलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे सरकारी नोकरी मिळवण्याची. संस्थेने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पदाचे नाव: शिकाऊ इलेक्ट्रिशियन (Apprentice – Electrician)
पदसंख्या: एकूण 15 जागा
नोकरी ठिकाण: पुणे
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
तसेच वीजतंत्री (Electrician) ट्रेडमधून ITI परीक्षा पूर्ण असावी (सर्व सेमिस्टरची मार्कशीट आवश्यक)
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधून कोर्स केला असावा
वयोमर्यादा
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू
अर्जाची पद्धत: पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 ऑक्टोबर 2025
मुलाखत दिनांक: 30 ऑक्टोबर 2025, सकाळी 11:00 वाजता
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,
अ उ दा सं व सु विभाग- 2,
सर्वे नं. 121, नवीन पर्वती उपकेंद्र आवार,
पहिला मजला, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ,
सिंहगड रस्ता, पुणे - 411 030
इयत्ता 10वीची मार्कशीट/प्रमाणपत्र
ITI चे सर्व सेमिस्टरचे मार्कशीट
जात प्रमाणपत्र / जात वैधता (असल्यास)
EWS प्रमाणपत्र (असल्यास)
आधार कार्ड
शाळा सोडल्याचा दाखला
या भरती प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे होणार आहे, त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी दिलेल्या दिवशी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिकृत वेबसाईट – mahatransco.in
जाहिरात PDF डाउनलोड करा