LPG Gas : या लोकांना 30 जूननंतर एलपीजी कनेक्शन नाही, सरकारचे नवे नियम

Published : Jun 22, 2026, 07:13 PM IST
LPG Gas

सार

एलपीजी गॅस कनेक्शनबाबत महत्त्वाची माहिती आहे. एका कुटुंबात एलपीजी आणि पीएनजी अशी दोन्ही गॅस कनेक्शन असल्यास त्या कुटुंबाचं एलपीजी कनेक्शन बंद होऊ शकतं. काय आहे नेमका नियम? जाणून घ्या सविस्तर.

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी इराण-अमेरिका युद्धादरम्यान भारतात गॅसचा, इंधनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. अशात गॅसचा काळाबाजार थांबवणं गरजेचं होतं. त्यामुळे गरजूंना पुरेसा पुरवठा करण्यासाठी आणि काळाबाजार थांबवण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली. या काळात सरकारने एकाच घरात दोन्ही गॅस कनेक्शन अर्थात पीएनजी आणि एलपीजी गॅस असल्यास एलपीजी गॅसचं कनेक्शन हे पीएनजी पाईपलाईन गॅसवर स्विच करणारा नियम काढला होता आणि त्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली होती.

काय होता नवा नियम?

मार्च २०२६ मध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाने एक आदेश काढला. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादन वितरण आदेश २०२६ या अंतर्गत नॅशनल पाईप नॅचरल गॅस ड्राईव्ह २.० ही मोहिम सुरू केली. याअंतर्गत एक कुटुंब एकाच वेळी एलपीजी आणि पीएनजी अशी दोन्ही कनेक्शन ठेवू शकत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. सरकारने एकाच घरात अशा दोन्ही कनेक्शनवर बंदी आणली. मार्चमध्ये काढलेल्या या आदेशासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली होती. आता ही ९० दिवसांची मुदत येत्या ३० जून रोजी संपणार आहे. आता ३० जूनची मुदत संपल्यानंतर ज्या घरात पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही गॅस कनेक्शन असतील तेथील एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर काही निर्बंध येऊ शकतात.

जर तुमच्याकडे आधीच PNG कनेक्शन असेल आणि तरीही तुम्ही LPG सिलेंडर वापरत असाल, तर अशी दोन-दोन कनेक्शन वापरता येणार नाहीत. ग्राहकांना त्यांचे LPG कनेक्शन परत करावं लागेल.

मात्र अशा एखाद्या भागात अद्याप PNG पुरवठा पोहोचला नसेल, तर ग्राहकांच्या LPG जोडणीमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्या भागात PNG गॅस पुरवठा सुरू होईपर्यंत LPG गॅस पुरवठा अखंडपणे चालू राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरुन जाण्याची कोणतीही गरज नाही.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Railway Update : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; तिकीट नाही काढलं, दंडाला पैसे नाहीत म्हटलं तर...
Muslim Girl Names: तुमच्या लाडक्या लेकीसाठी शोधा सर्वात सुंदर नाव! पाहा अर्थासह ५० खास 'मुस्लिम मुलींची नावे'