Anger Management: राग येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण काही जणांना छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग येतो आणि मग दिवसभर चिडचिड होते. पण काही सोप्या सवयींनी तुम्ही रागावर सहज नियंत्रण मिळवू शकता.
राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. कारण त्यावेळी भावनांचा जोर जास्त असतो. अशावेळी फक्त 10 सेकंद शांत राहिलात, तर मोठं भांडण टळू शकतं. हे 10 सेकंद तुम्हाला पुढचे 10 तास मनःशांती देतील.
25
त्या जागेवरून थोडं दूर व्हा
राग जास्त येत असेल आणि त्याच ठिकाणी थांबल्यास तो आणखी वाढू शकतो. अशावेळी तिथून थोडं दूर जाणं सर्वात उत्तम. जागा बदलल्यामुळे विचारही बदलतात आणि मन शांत झाल्यामुळे परिस्थिती अधिक स्पष्टपणे समजते.
35
दीर्घ श्वास घ्या आणि सोडा
दीर्घ श्वास घेतल्याने (Deep Breathing) मनातील चिडचिड कमी होते. यामुळे शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि मन शांत होण्यास मदत होते. हा एक छोटासा उपाय असला तरी राग कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
खूप राग आल्यावर आपलं शरीर गरम होतं, काहींना घामही येतो. अशावेळी एक ग्लास थंड पाणी प्या. पाण्यामुळे शरीर आणि घसा थंड होतो, ज्यामुळे मनही शांत व्हायला मदत होते.
55
थोडं चाला किंवा व्यायाम करा
राग आल्यावर थोडा वेळ चालायला (Walking) गेल्यास मन हलकं होतं. व्यायामामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलसोबत रागही जळतो, असं गंमतीने म्हणतात. 10 मिनिटं चालल्यानेही तुमचा ताण कमी होऊ शकतो.