एलआयसीच्या 'निवेश प्लस प्लॅन 850' (LIC Nivesh Plus Plan 850) मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे. यात तुम्ही एकदाच पैसे भरून बचत आणि इन्शुरन्स कव्हर दोन्ही मिळवू शकता. तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवले जातात. त्यामुळे परतावा निश्चित नसला तरी, तुम्ही निवडलेल्या फंडानुसार तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
24
या प्लॅनमध्ये गुंतवणूकदार त्यांच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार ४ फंड निवडू शकतात
बॉन्ड फंड (Bond Fund) - यात तुमचे पैसे सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड्समध्ये गुंतवले जातात. यात रिस्क खूप कमी असते.
सिक्युअर्ड फंड (Secured Fund) - यात तुमचे पैसे बाँड्स आणि मनी मार्केटमध्ये लागतात. यात रिस्क कमी ते मध्यम असते.
बॅलन्स्ड फंड (Balanced Fund) - यात तुमचे पैसे कर्जरोखे आणि शेअर बाजारात समान प्रमाणात गुंतवले जातात. यात रिस्क मध्यम असते.
ग्रोथ फंड (Growth Fund) - यात सर्वाधिक पैसे शेअर बाजारात लागतात. यात रिस्क जास्त असली तरी दीर्घकाळासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही वर्षातून ४ वेळा कोणत्याही शुल्काविना फंड बदलू शकता.
34
पॉलिसीधारक त्यांच्या गरजेनुसार दोनपैकी एक लाइफ इन्शुरन्स कव्हर निवडू शकतात
ऑप्शन १ - तुम्ही भरलेल्या रकमेच्या १.२५ पट इन्शुरन्स कव्हर हवा असेल, तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता.
ऑप्शन २ - तुम्ही भरलेल्या प्रीमियमच्या १० पट रक्कम लाइफ कव्हर म्हणून हवी असेल, तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे.
पॉलिसी घेतल्यावर पहिल्या ५ वर्षांत तुम्ही पैसे काढू शकत नाही किंवा पॉलिसी रद्द करू शकत नाही. हा शेअर बाजाराशी निगडीत प्लॅन आहे. त्यामुळे बँकेच्या एफडीसारखा (FD) निश्चित परतावा यात मिळत नाही. शेअर बाजारातील चढ-उतारांवर तुमचा नफा अवलंबून असतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .