दररोज फक्त 45 रुपये वाचवा आणि 25 लाखांचा निधी मिळवा, LIC ची दमदार स्कीम!

Published : Aug 19, 2025, 05:28 PM IST

LIC Yojana News : LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये दररोज ₹45 गुंतवून 25 लाखांचा निधी मिळवू शकता. ही योजना सुरक्षा, बचत आणि भविष्यातील मोठ्या परताव्याचे त्रिसूत्री लाभ देते.

PREV
16

LIC Yojana News : काही छोटीशी बचत दररोज करत गेल्यास भविष्यात लाखोंचा निधी उभा करता येतो, हे भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. LIC ची खास 'जीवन आनंद पॉलिसी' ही अशी योजना आहे, जिथे केवळ 45 रुपयांच्या दररोज बचतीतून तुम्ही 25 लाखांपर्यंतचा भक्कम निधी मिळवू शकता. ही योजना सुरक्षा, बचत आणि भविष्यातील मोठ्या परताव्याचे त्रिसूत्री लाभ देते.

26

छोट्या बचतीतून मोठा लाभ, LIC ची संधी

अनेकांना वाटतं, मोठा निधी उभा करायचा असेल तर मोठी गुंतवणूक करावी लागते. पण LIC च्या या योजनेनं हे गैरसमज खोडून काढले आहेत. 'जीवन आनंद' योजनेअंतर्गत दरमहा केवळ ₹1,358 म्हणजेच रोज फक्त ₹45 बाजूला ठेवून तुम्ही 35 वर्षांत सुमारे ₹25 लाखांचा निधी उभा करू शकता. विशेष म्हणजे, ही योजना केवळ बचतसाधन नाही, तर एक प्रभावी विमा कवचही प्रदान करते.

36

25 लाखांचा फंड कसा तयार होतो?

जर तुम्ही या पॉलिसीत 35 वर्षांसाठी दरवर्षी ₹16,300 जमा करत राहिलात, तर एकूण गुंतवणूक ₹5,70,500 इतकी होईल. परंतु पॉलिसी पूर्ण झाल्यावर तुमचं मूळ रक्कम तर मिळतेच, शिवाय LIC कडून मिळणाऱ्या बोनसचा भरघोस फायदा सुद्धा होतो.

मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारे अंदाजे लाभ

मूळ विमा रक्कम: ₹5,00,000

रिव्हिजनरी बोनस: ₹8,60,000

अंतिम अतिरिक्त बोनस: ₹11,50,000

एकूण रक्कम: ₹25,10,000 (अंदाजे)

46

डबल बोनसचा लाभ, LIC चं खास वैशिष्ट्य

ही योजना दोन प्रकारच्या बोनससह येते

रिव्हिजनरी बोनस – प्रत्येक वर्षी पॉलिसीधारकाच्या खात्यात जमा केला जातो

फायनल अ‍ॅडिशनल बोनस – पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी दिला जातो

अर्थात, हे लाभ पूर्ण मिळण्यासाठी पॉलिसी किमान 15 वर्षे सुरू असणं आवश्यक आहे.

56

विमा कवच आणि रायडर्सचा पर्याय

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला केवळ बचतीचा लाभच नाही, तर उत्तम विमा संरक्षण देखील मिळतं. पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, नामनिर्दिष्ट व्यक्तीला मूळ विमा रकमेवर 125% बोनससह मृत्यू लाभ दिला जातो. याशिवाय, चार अतिरिक्त रायडर्स जोडण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

अपघाती मृत्यू रायडर

कायमस्वरूपी अपंगत्व रायडर

गंभीर आजार रायडर

टर्म इन्शुरन्स रायडर

66

कमी गुंतवणूक, जास्त सुरक्षा आणि मोठा परतावा!

LIC ची ही 'जीवन आनंद' योजना तुम्हाला कमी गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवून देते. दररोज फक्त 45 रुपये बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी एक सुरक्षित आर्थिक पाठबळ तयार करू शकता.

टीप: योजनेशी संबंधित सर्व फायदे व अटी तपासण्यासाठी आणि वैयक्तिक सल्ल्यासाठी जवळच्या LIC कार्यालयाशी संपर्क साधावा.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories