इलेक्ट्रिक स्कुटर चार्ज केल्यानंतर ३२० किमीपर्यंत पळणार, जाणून घ्या टॉपचे पर्याय

Published : Feb 07, 2026, 03:37 PM IST

इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये ओला एस१ प्रो, सिंपल वन जेन २, आणि टीव्हीएस आयक्यूब एसटी सारख्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्कूटर्सची माहिती दिली आहेत.

PREV
16
इलेक्ट्रिक स्कुटर चार्ज केल्यानंतर ३२० किमीपर्यंत पळणार, जाणून घ्या टॉपचे पर्याय

आपण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ती स्कुटर आपल्याला चांगला मायलेज देत असते. आज तुम्हाला इलेक्ट्रिक स्कुटर्स माहिती सांगणार आहोत.

26
ओला एस1 प्रो स्पोर्ट

ओला इलेक्ट्रिकच्या रेंज स्कुटरबद्दल बोलायचे झाले तर त्याचे ओला एस 1 प्रो स्पोर्ट 5.2 केडब्ल्यूएच मॉडेल सर्वात खास मॉडेल घेऊन आलं आहे. या प्रीमियम स्कुटरमध्ये कंपनीकडून आपल्याला 5.2 kWh चा बॅटरी पॅक असून ती ३२० किलोमीटरपर्यंत पळू शकणार आहे.

36
सिंपल वन जनरेशन 2 मॉडेल

सिम्पल कंपनीने त्यांची वन जेन २ मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. हि स्कुटर भारतीय मार्केटमध्ये सिंगल चार्ज रेंज चांगली देत असते. सिंपल वन जेन 2 5 kWh व्हेरिएंट मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1,77,999 रुपये आहे. हे 5 kWh बॅटरीद्वारे सपोर्ट आहे, ज्याचा कंपनीचा दावा आहे की 265 किमीपर्यंत सिंगल चार्ज रेंज आहे.

46
टीव्हीएस आयक्यूब एसटी

टीव्हीएस मोटार कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी गाडी म्हणून आयक्युब एसटी या गाडीचं नाव आज मार्केटमध्ये आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत १,६२,७०४ रुपये आहे. हि गाडी एकदा चार्ज केल्यानंतर २१२ किलोमीटर जात असते.

56
रिवर इंडी

भारतात रिवर इंडी या गाडीने मार्केटमध्ये वेड लावलं आहे. तिची किंमत १,४२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या गाडीला एकदा चार्ज केल्यानंतर ती १६३ किलोमीटर पर्यंत जाते.

66
प्युअर ईव्ही ईप्लूटो 7 जी मॅक्स

PURE EV Epluto 7G Max या गाडीची भारतात चांगली विक्री होत आहे. या गाडीची शोरूमला किंमत हि १,१७,६९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हि गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटर ते 211 किलोमीटरची रेंज देते.

Read more Photos on

Recommended Stories