
Komaki MX16 Pro Electric Cruiser Bike Launch : कोमाकी इलेक्ट्रिकने आपली नवीन क्रूझर बाईक कोमाकी MX16 प्रो लाँच केली आहे. कंपनीने ही मोटरसायकल १,६९,९९९ रुपये एक्स-शोरूम किंमतीत सादर केली आहे. ज्यांना स्टाईल, दमदार कामगिरी आणि कमी ऑपरेटिंग खर्च हवा आहे, त्यांच्यासाठी ही बाईक एक उत्तम पर्याय असेल असा कंपनीचा दावा आहे. MX16 प्रो केवळ दिसण्यातच नाही, तर तंत्रज्ञान आणि रेंजमध्येही आपल्या सेगमेंटमधील अनेक बाईक्सना टक्कर देते.
MX16 प्रो ला कोमाकीने पूर्ण मेटल बॉडी दिली आहे. ही टिकाऊ आणि धक्के सहन करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. स्थिर रायडिंगसाठी लांब फ्रेम, रुंद आणि आरामदायक सीट, कमी व्हायब्रेशन असलेली इलेक्ट्रिक मोटर आणि रस्त्यावर त्वरित लक्ष वेधून घेणारी क्लासिक क्रूझर स्टाईल ही याच्या डिझाइनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने स्टाईल अधिक आकर्षक करण्यासाठी दोन रंगांचे पर्यायही दिले आहेत.
कामगिरी आणि रेंजच्या बाबतीत, यात 5 kW ची मोटर आहे. तिचा वेग ताशी 80 किलोमीटर आहे आणि रेंज 220 किलोमीटरपर्यंत आहे. MX16 प्रो मध्ये 5 kW BLDC हब मोटर आणि 4.5 kWh बॅटरी पॅक आहे. कोमाकी 160-220 किलोमीटरच्या रेंजचा दावा करते. कंपनीने तुलना केली आहे की 200 किलोमीटर चालवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाला ₹15-20 खर्च येतो, तर पेट्रोल बाईकला तेवढेच अंतर कापण्यासाठी सुमारे 700 रुपये लागतात.
हायवे आणि शहरी परिस्थितीत ब्रेकिंग अधिक स्थिर करण्यासाठी कोमाकी MX16 प्रो मध्ये ट्रिपल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. क्रूझर स्टाईलच्या आरामावर लक्ष केंद्रित करून सस्पेन्शन सेटअप देखील ट्यून केले आहे. MX16 प्रो ही तिच्या सेगमेंटमधील सर्वाधिक फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक क्रूझरपैकी एक आहे. फुल-कलर टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, ऑटो रिपेअर स्विच आणि पार्क असिस्ट ही तिची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.