Kitchen Tips: घरी रेडिमेड पावडर वापरून बनवलेले गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होत नाहीत? मग ही सोपी ट्रिक खास तुमच्यासाठी आहे. पीठ मळताना पाण्याऐवजी दूध आणि तुपाचं खास मिश्रण वापरा. या पद्धतीने तुम्ही हॉटेलसारखे परफेक्ट गुलाबजाम घरीच बनवू शकता.
आजकाल बाजारात गुलाबजाम बनवण्यासाठी रेडिमेड पावडर पॅकेट सहज मिळतात. पण हे पीठ वापरूनही गुलाबजाम हॉटेलसारखे बनत नाहीत, अशी अनेकांची तक्रार असते. चला तर मग, गुलाबजामचं पीठ योग्य पद्धतीने कसं मळायचं ते पाहूया.
24
पाण्याऐवजी दुधाचा वापर करा
दुकानातून आणलेलं इन्स्टंट गुलाबजाम पावडर एका मोठ्या भांड्यात घ्या. अनेकजण हे पीठ पाण्याने मळतात, पण हीच मोठी चूक आहे. पाण्याऐवजी पीठ मळण्यासाठी दूध वापरा. यामुळे गुलाबजाम छान मऊ होतात.
34
पीठ असं तयार करा
एका वाटीत दूध आणि तूप एकत्र करून गरम करा. दूध गरम झाल्यावर त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला. आता या दुधाने गुलाबजामचं पीठ मळून घ्या. त्यानंतर एका सुती कापडाने झाकून ते 30 मिनिटं बाजूला ठेवा. 30 मिनिटांनंतर, पिठाचे छोटे गोळे करून ते तुपात किंवा तेलात तळून घ्या.
आता साखर आणि वेलची घालून तयार केलेल्या पाकात हे तळलेले गुलाबजाम टाका. गुलाबजाम कमीत कमी 2 तास पाकात मुरू द्या. यामुळे पाक आतपर्यंत जातो आणि तुम्हाला खाण्यासाठी एकदम मऊ, रसरशीत गुलाबजाम मिळतात.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .