४. क्रोटन प्लांट (Croton Plant)
क्रोटन हे इनडोअर आणि आऊटडोअर दोन्हीसाठी उत्तम आहे. याची पानं फक्त हिरवीच नाहीत, तर लाल, पिवळी, निळी, नारंगी, गुलाबी अशा अनेक रंगांची असतात. घराला रंगीबेरंगी लुक देण्यासाठी हे झाड नक्की लावा. हे फक्त दिसायला सुंदर नाही, तर घरातील विषारी घटक शोषून हवा शुद्ध करतं. याला पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. एकदा नीट वाढल्यावर हे झाड वर्षानुवर्षे टिकतं आणि सर्व ऋतूंमधील तापमान सहज सहन करतं.
काळजी- क्रोटनचा दुधासारखा रस थोडा विषारी असतो. त्वचेच्या संपर्कात आल्यास खाज सुटू शकते. त्यामुळे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा. कटिंग केल्यानंतर लगेच हात धुवा.
५. फिटोनिया प्लांट (Fittonia Plant)
फिटोनियाचं सौंदर्य त्याच्या लहान, चमकदार पानांमध्ये आहे. हे एक छोटंसं रोप आहे जे हळूहळू वाढतं. तुम्ही याला सोफा टेबल, स्टडी टेबल किंवा कॉर्नर टेबलवर ठेवू शकता. या रोपाला ओलावा आवडतो, त्यामुळे याला काचेच्या भांड्यात किंवा टेरारियममध्ये (terrarium) ठेवणं चांगलं. जर तुम्ही साध्या कुंडीत लावत असाल, तर पाण्याकडे लक्ष ठेवा. पाणी कमी झाल्यास ते लगेच सुकतं, पण खराब होत नाही. पुन्हा पाणी दिल्यावर ते लगेच ताजंतवानं दिसू लागतं.