Kitchen Tips: मिक्सरच्या ब्लेडची बोथट धार मिनिटांमध्ये करा नव्यासारखी धारदार

Published : Apr 30, 2026, 09:52 PM IST

Kitchen Tips: तुमच्या मिक्सरच्या भांड्यात डाळ किंवा मसाले व्यवस्थित बारीक होत नाहीत का? वाटायला खूप वेळ लागतोय? काळजी करू नका! काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही घरच्या घरीच मिक्सरची धार पुन्हा तेज करू शकता.

PREV
13
मिक्सर जार
आजकाल प्रत्येकाच्या घरात मिक्सर असतोच. चटणी, मसाले, स्मूदी बनवण्यासाठी तो लागतोच. पण सततच्या वापराने त्याच्या पात्यांची धार कमी होते आणि वाटायला जास्त वेळ लागतो. अनेकजण दुरुस्तीवर खर्च करतात किंवा नवीन मिक्सर घेतात. पण त्याची गरज नाही, कारण त्यावर काही सोपे उपाय आहेत.
23
खडे मीठ
१. अंड्याची टरफलं: अंड्याची टरफलं स्वच्छ धुवून आणि वाळवून घ्या. ती मिक्सरच्या भांड्यात टाकून काही सेकंद फिरवा. टरफलांच्या खरखरीतपणामुळे पाती स्वच्छ होतात आणि त्यांना धारही येते. २. खडे मीठ: हा तर सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. भांड्यात एक चमचा खडे मीठ टाकून मिक्सर फिरवा. मिठाच्या दाण्यांमुळे पाती पुन्हा तीक्ष्ण होतात.
33
बर्फाचे खडे:
३. बर्फाचे खडे: भांड्यात ३-४ बर्फाचे खडे टाकून मिक्सर फिरवा. यामुळे पात्यांना चिकटलेली घाण निघून जाते आणि ती धारदार होतात. ४. बेकिंग सोडा: पात्यांवर चिकटपणा किंवा घाण असेल तर बेकिंग सोडा वापरा. थोड्या पाण्यात सोडा मिसळून पेस्ट बनवा, ब्रशने पात्यांना लावा आणि ५ मिनिटांनी धुवा. ५. ॲल्युमिनियम फॉइल: फॉइलचा छोटा तुकडा गोळा करून चेंडूसारखा बनवा. तो भांड्यात टाकून काही सेकंद मिक्सर फिरवा. यामुळे पात्यांवरील लहान दोष दूर होतात.
Read more Photos on

Recommended Stories