Kitchen Hack: जागतिक तणावामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अशावेळी गॅसची बचत करणं खूप गरजेचं आहे. स्वयंपाक करताना लहान लहान गोष्टी लक्षात घेतल्या, त्यावर अंमलबजावणी केली तर सिलेंडर जास्त चालेल. गॅस वाचवणारी एक सोपी ट्रिक जाणून घेऊया…
इराण-इस्रायल संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम थेट आपल्या स्वयंपाकघरावर होतोय. LPG गॅसच्या किमती तर वाढल्याच, पण वेळेवर डिलिव्हरीही मिळत नाही. त्यामुळे गॅस वाचवणं आता गरजेचं झालं आहे.
25
थोड्या भातासाठी गॅस नको!
अनेक जण एक किंवा अर्धा ग्लास तांदूळ शिजवण्यासाठी गॅस वापरतात. त्यांना वाटतं की इलेक्ट्रिक कुकरचं भांडं खूप मोठं आहे. पण यामुळे आपला महागडा गॅस वाया जातो. आता तुम्ही इलेक्ट्रिक राइस कुकरमध्येच कमी भात शिजवू शकता.
35
राइस कुकरमधील भांड्याची ट्रिक
यासाठी, तुम्हाला जेवढा भात शिजवायचा आहे, तेवढे तांदूळ (अर्धा किंवा एक ग्लास) एका लहान स्टीलच्या भांड्यात घ्या. ते स्वच्छ धुवा आणि त्यात अंदाजे पाणी घालून बाजूला ठेवा.
इलेक्ट्रिक राइस कुकरच्या मोठ्या भांड्यात साधारण दीड ते दोन ग्लास पाणी टाका. आता आपण तयार केलेलं तांदळाचं लहान स्टीलचं भांडं थेट त्या पाण्यात ठेवा. स्टीलच्या भांड्यावर झाकण ठेवा आणि नंतर कुकरचं मुख्य झाकण बंद करा. आता कुकरचं बटण दाबून 'कुकिंग' मोड सुरू करा.
55
भात तयार, गॅसची बचत!
साधारण 30 ते 35 मिनिटांत कुकर आपोआप 'वॉर्म' मोडवर जाईल. झाकण उघडून पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की स्टीलच्या भांड्यातला भात छान मोकळा शिजला आहे. या ट्रिकमुळे कुकरचं मुख्य भांडं करपत नाही आणि ते धुवायलाही सोपं जातं. यामुळे तुमचा गॅस तर वाचतोच, पण कमी भात शिजवण्याचा त्रासही संपतो.