
Kia seltos launch date : सेकंड जनरेशनमधील किआ सेल्टोस अखेर 10 डिसेंबर 2025 रोजी बेंगळुरूमध्ये भव्य कार्यक्रमात लाँच होणार आहे. लाँचपूर्वीच कंपनीने अनेक टीझर्स प्रसिद्ध करून उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये या नवीन सेल्टोसची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायराइडर, स्कोडा कुशक, फोक्सवॅगन तैगुन, होंडा एलिव्हेट आणि येणाऱ्या टाटा सिएरा यांच्याशी होणार आहे. या सर्वांना टक्कर देण्यासाठी सेल्टोसने डिझाइनपासून फीचर्सपर्यंत जबरदस्त बदल केले आहेत.
नवीन 2026 किआ सेल्टोसमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पूर्णपणे नवीन फ्रंट एंड. अधिक मस्क्युलर हुड, नव्या एलईडी हेडलॅम्प्स, तीक्ष्ण डीआरएल डिझाइन आणि ठळक फ्रंट बंपरमुळे गाडी अधिक दमदार आणि प्रीमियम दिसते. जुना मॉडेल जिथे कर्वी होता, तिथे नवीन सेल्टोस अधिक बॉक्सी आणि स्ट्रेट सिल्हुएटसह येतो. मागील बाजूला नवीन भूगोलिक डिझाइनचे एलईडी टेललॅम्प आणि मध्यभागातून जाणारा लाईट बार हे लूकला आणखी आकर्षक बनवतात. नवीन अलॉय व्हील्स गाडीच्या उपस्थितीत भर घालतात.
नवीन 2026 सेल्टोस पूर्वीच्या मॉडेलपेक्षा लांब आणि रुंद असेल. सध्याचे माप 4365 मिमी लांबी, 1800 मिमी रुंदी आणि 1645 मिमी उंची असून, नवीन मॉडेल त्यापेक्षा मोठे असण्याची माहिती मिळते. त्यामुळे रस्त्यावर त्याची उपस्थिती अधिक दमदार दिसणार तर इंटीरियरमध्ये बसण्यासाठीही अतिरिक्त जागा मिळणार आहे. केबिनमध्ये काळा आणि बेज रंगाचा ड्युअल-टोन इंटीरियर, नवीन तीन-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील आणि प्रीमियम मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. सायरोसप्रमाणेच, यामध्ये वक्र ड्युअल-स्क्रीन सेटअप दिला जाईल जो वायरलेस Android Auto व Apple CarPlay ला सपोर्ट करेल.
इंटीरियरमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन डॅशबोर्ड डिझाइन, सुधारित HVAC कंट्रोल पॅनल, पातळ एसी व्हेंट्स, अॅम्बियंट लाईट स्ट्रिप्स, नवीन सेंटर कन्सोल आणि मोठी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. ड्राइव्ह आणि ट्रॅक्शन मोड बटणे अधिक प्रगत डिझाइनमध्ये येतील. सुरक्षेच्या दृष्टीनेही अपडेटेड एडीएएस फीचर्स जोडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होईल.
इंजिन पर्याय पूर्वीप्रमाणेच राहतील—
मात्र, डिझेल इंजिनसाठी उपलब्ध असणारा जुना 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आता नवीन 7-स्पीड ऑटोमॅटिक ने बदलला जाऊ शकतो. यामुळे परफॉर्मन्ससह मायलेजमध्येही सुधारणा दिसू शकते.