जिओचे कॉलिंगसाठी परवडणारे टॉकटाइम प्लॅन्स, १० रुपयांपासून सुरुवात

रिलायन्स जिओने केवळ कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी सोपे आणि परवडणारे टॉकटाइम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. कीपॅड मोबाईल वापरकर्त्यांना डेटा प्लॅन्सची गरज नसताना, केवळ १० रुपयांपासून सुरू होणारे टॉकटाइम व्हाउचर जिओकडून मिळू शकतात.

मुंबई: सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी मोफत कॉलिंगची सुविधा नव्हती. त्यासाठी ग्राहकांना रिचार्ज करावे लागायचे. या पैशांमधून काही रक्कम वजा जाताच उर्वरित रक्कम वापरकर्त्यांच्या खात्यात जमा व्हायची. कॉल केल्यावर मिनिट किंवा सेकंदांच्या आधारावर पैसे कमी व्हायचे. पण आता सर्व टेलिकॉम कंपन्या कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल करण्याची सुविधा देतात. पण आता रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना जुन्या काळात घेऊन जात आहे. केवळ कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने सोपे आणि परवडणारे पर्याय आणले आहेत.

आजही अनेक लोक कीपॅड मोबाईल वापरतात. हे लोक केवळ कॉल करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी मोबाईल वापरतात. पण आजकालच्या सर्व टेलिकॉम कंपन्या डेटा आधारित प्रीपेड प्लॅन्स देतात. त्यामुळे इंटरनेट वापरत नसतानाही डेटा प्लॅन्स रिचार्ज करावे लागतात.

आम्हाला कोणतेही इंटरनेट, अतिरिक्त अॅप्सचा अॅक्सेस नको आहे. आम्ही केवळ कॉल करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी मोबाईल वापरतो, आम्हाला पूर्वीप्रमाणेच टॉकटाइम व्हाउचरचा पर्याय द्यावा अशी अनेकांची मागणी होती. सध्या जिओकडूनच टॉकटाइम-मात्र टॉप-अप व्हाउचर मिळतात. इंटरनेट वापरत नसलेले लोक टॉकटाइमद्वारे व्हाउचर अॅक्टिव्हेट करू शकतात. पूर्वीप्रमाणेच केवळ १० रुपयांपासून जिओ टॉकटाइम टॉप-अप व्हाउचर सुरू होतात.

किंमतटॉकटाइम
१० रुपये७.४७ रुपये
२० रुपये१४.९५ रुपये
५० रुपये३९.३७ रुपये
१०० रुपये८१.७५ रुपये
५०० रुपये४२०.७३ रुपये
१००० रुपये८४४.४६ रुपये

वेगळे रिचार्ज करण्याचा प्रस्ताव नाही
लोकसभा अधिवेशनादरम्यान, आपल्या देशात आजही अनेक जण स्मार्टफोन वापरत नाहीत. कीपॅडसारखे छोटे फोन वापरणाऱ्यांना कोणत्याही डेटाची गरज नसते. जर असेल तर ते खूपच कमी असते. म्हणून या वर्गातील वापरकर्त्यांसाठी विशेष टॅरिफ प्लॅन्स आणण्याबाबत चर्चा सुरू असून, याबाबत सरकारसमोर प्रस्ताव आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना दूरसंचार मंत्रालयाने सांगितले की, सध्या सरकारसमोर अशी कोणतीही योजना नाही. यासंदर्भात कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही असे सभागृहाला सांगण्यात आले.

Share this article