Dairy Startup : डेरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आयटीची नोकरी सोडली, आता मार्केट रिसर्चसाठी तरुण चालवतोय रॅपिडो

Published : Oct 06, 2026, 12:21 PM IST
Dairy Startup : डेरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आयटीची नोकरी सोडली, आता मार्केट रिसर्चसाठी तरुण चालवतोय रॅपिडो

सार

प्रवाशांशी गप्पा मारून दिनेशला केवळ पैसेच मिळत नाहीत, तर ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि मार्केटची गरजही थेट समजायला मदत होत आहे.

ओडिशा : आयटी क्षेत्रातील नोकरी म्हणजे चांगला पगार आणि सुरक्षित भविष्य. पण, ओडिशाच्या दिनेशने स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी ही नोकरी सोडली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा माजी कर्मचारी असलेला दिनेश सध्या बंगळुरूमध्ये रॅपिडो बाईक चालवतोय. पण तो हे पैशांसाठी नाही, तर आपल्या व्यवसायाच्या मार्केट रिसर्चसाठी करत आहे. वरुण राज नावाच्या एका तरुणाने लिंक्डइनवर दिनेशची ही भन्नाट गोष्ट शेअर केली आहे.

सोमवारी सकाळी वरुण राजने दिनेशची रॅपिडो बुक केली होती. प्रवासादरम्यान दिनेशने त्याला मार्केट रिसर्चची ही अनोखी पद्धत सांगितली. नेहमीच्या दुधाव्यतिरिक्त लोक कोणते डेअरी प्रॉडक्ट्स विकत घेतात, असे काही प्रश्न दिनेशने वरुणला विचारले. जेव्हा वरुणने त्याला या प्रश्नांमागचं कारण विचारलं, तेव्हा दिनेशने अगदी साधं उत्तर दिलं, 'सर, असं केल्याने पैसेही मिळतात आणि ग्राहकांचा फीडबॅकही मिळतो.'

रॅपिडो चालवताना दिनेश थेट आपल्या टार्गेट ऑडियन्सशी म्हणजेच प्रवाशांशी बोलतो. यामुळे त्याला प्रवासाचे पैसे तर मिळतातच, पण ग्राहकांना नेमकं काय हवंय आणि मार्केटची गरज काय आहे, हेही थेट समजायला मदत होते. बंगळुरूमध्ये आपल्या बिझनेस आयडियाचा पाया पक्का केल्यानंतर, दिनेशला त्याच्या मूळ गावी, ओडिशामध्ये अधिकृतपणे डेअरी व्यवसाय सुरू करायचा आहे. यासाठी त्याने स्वतःला एका वर्षाची मुदत दिली आहे.

दिनेशच्या या हटके स्टाईलचं लिंक्डइनवर खूप कौतुक होत आहे. त्याच्या या प्रॅक्टिकल प्रयत्नांना अनेक जण दाद देत आहेत. ग्राहकांना थेट भेटून त्यांच्याशी बोलण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मार्केट रिसर्च असू शकत नाही, असं मत सोशल मीडियावर लोक व्यक्त करत आहेत. दिनेश भविष्यात कोणते प्रॉडक्ट्स बाजारात आणणार, याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gold Price Drop : आता सोनं खरेदी करू नका, कारण काय? आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थेचा महत्त्वाचा इशारा
Women Safety : कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नवी नियमावली; आता प्रवास होणार अधिक सुरक्षित