Train Delay Rules : ट्रेन उशिरा झाल्यास प्रवाशांना मिळते फुकटात जेवण; IRCTC चे हे नियम माहितेयत का?

Published : Jun 23, 2026, 03:24 PM IST
IRCTC Rules

सार

Train Delay Rules : रेल्वेचे तिकिट काढल्यानंतर काहीवेळेस गाडी येण्यास बऱ्याचदा उशिर होतो. अशावेळी प्रवाशांमध्ये संताप निर्माण होतो. पण ट्रेन उशिरा आल्यानंतर प्रवाशांना गाडीत काही सुविधा पुरवल्या जातात. 

Train Delay Rules : भारतात रेल्वेने प्रवास करताना गाड्यांचा उशीर हा अनेकदा प्रवाशांसाठी त्रासदायक ठरतो. काही वेळा काही मिनिटांचा विलंब होतो, तर अनेकदा तासन्‌तास प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते. मात्र, अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीकडून (IRCTC) प्रवाशांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये मोफत जेवण,नाश्ता आणि काही प्रकरणांमध्ये तिकीटाचे पैसेही परत मिळतात. अनेक प्रवाशांना या नियमांची माहिती नसल्याने ते या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत.

 गाड्यांमध्ये मिळते मोफत जेवण

आयआरसीटीसीच्या केटरिंग धोरणानुसार, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि दुरंतो एक्सप्रेससारख्या प्रीमियम गाड्या ठरावीक वेळेपेक्षा जास्त उशिरा धावत असल्यास प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. गाडी येण्यास उशिर झाल्यास तुम्हाला वेळेनुसार नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, चहा दिला जातो. 

जेवणात काय मिळते?

मोफत दिल्या जाणाऱ्या नाश्तामध्ये चहा किंवा कॉफीसोबत बिस्किटांचा समावेश असतो. नाश्त्यामध्ये ब्रेड-बटर, फळांचा ज्यूस आणि गरम पेये दिली जातात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भात, डाळ, राजमा किंवा छोले तसेच लोणच्याची पाकिटे दिली जातात. काही वेळेस पुरी-भाजी दिली जाते.

तिकीट रद्द केल्यास?

जर रेल्वे तीन तासांपेक्षा अधिक उशिरा असेल किंवा तिच्या मार्गात मोठा बदल करण्यात आला असेल, तर प्रवासी तिकीट रद्द करून शकतात. या प्रकरणात तुम्हाला तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. ऑनलाइन बुकिंग केले असल्यास बँक खात्यात जमा होतात. प तर, काउंटरवरून घेतलेल्या तिकिटांसाठी रेल्वे स्थानकावर जाऊन तिकीट रद्द करावी लागते. 

प्रवाशांसाठी अतिरिक्त सुविधाही उपलब्ध

रेल्वेला येण्यास उशिर झाल्यास तुम्हाला रेल्वे स्थानकांवरील गेस्ट रुममध्ये थांबण्याची फ्री मध्ये सुविधा मिळते. रात्रीच्या वेळेस फूड्सची दुकाने उशिरापर्यंत ठेवली जातात. याशिवाय आरपीएफच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील सोय केली जाते.

 

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

BigFlix: भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता OTT प्लॅटफॉर्म! तुम्हाला माहितीये का ही गोष्ट?
Mahindra XUV 3XO CNG: महिंद्रा XUV 3XO मध्ये होणार मोठा बदल?