6.9 इंच प्रोमोशन OLED डिस्प्ले, A19 प्रो चिप, 12GB RAM सह iPhone 17 प्रो मॅक्स येईल. अपग्रेडेड ट्रिपल 48MP लेन्स कॅमेरा सेटअप, 10x ऑप्टिकल झूमपर्यंत पेरिस्कोप झूम लेन्स, अपग्रेडेड बॅटरी आणि कूलिंग सिस्टम हे त्याचे वैशिष्ट्ये आहेत. मजिन बू यांच्या मते, Apple नवीन अँटेना सिस्टम आणेल ज्यामुळे वायरलेस कनेक्टिव्हिटी सुधारेल. काळा, पांढरा, स्टील ग्रे, हिरवा, जांभळा, फिकट निळा अशा रंगांमध्ये तो उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. बेसिक iPhone मॉडेल काळा, पांढरा, राखाडी, गडद निळा, नारिंगी अशा रंगांमध्ये येऊ शकतो.