
मुंबई : जर तुम्ही आयफोन घेण्याचा प्लॅन करत असाल पण मोठी किंमत पाहून मन बदलत असाल तर आता असे करण्याची गरज नाही. कारण अमेझॉनवर iPhone 15 Plus वर असा ऑफर सुरू आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि जबरदस्त डिस्काऊंट मानला जात आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही आयफोन फक्त २५,००० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर चला जाणून घेऊया या फोनवर काय आणि किती ऑफर सुरू आहे?
iPhone 15 Plus (२५६GB प्रकार) ची मूळ किंमत ₹८९,९०० आहे, पण अमेझॉनने यावर १९% ची मोठी सवलत दिली आहे. आता हा फोन तुम्हाला फक्त ₹७२,९९० मध्ये मिळू शकतो. यावर बाकी ऑफर्सचा फायदा घेऊन फक्त ₹२५,००० मध्ये खरेदी करू शकता.
अमेझॉनवर आयफोन १५ प्लस खरेदी केल्यास निवडक बँक कार्ड्सवर ₹३,००० ची त्वरित सवलतही मिळत आहे. त्यासोबतच ₹२,१८७ पर्यंतचा कॅशबॅकही मिळेल. या ऑफर्सनंतर अॅपलच्या या फोनची किंमत आणखी कमी होईल.
हा फोन मासिक ₹३,२८४ च्या सोप्या EMI वरही खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल, तर तो एक्सचेंज करून ही किंमत आणखी कमी करता येईल. अमेझॉन एक्सचेंज ऑफरमध्ये ₹६९,२५५ पर्यंतचा बोनसही देत आहे. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफर ४८,००० रुपयांचीही मिळाली तर iPhone 15 Plus फक्त २५,००० रुपयांमध्ये मिळू शकतो. ही ऑफर आतापर्यंतची सर्वात मोठी संधी मानली जात आहे.