IndiGo Flight Cancellation Pune Airport : इंडिगो एअरलाइनने ऑपरेशनल कारणांमुळे पुणे विमानतळावरील काही देशांतर्गत उड्डाणे १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान तात्पुरती रद्द केली. रद्द झालेल्या उड्डाणांत गुवाहाटी, चेन्नई, वाराणसी, बेंगळुरू या मार्गांचा समावेश आहे.
IndiGo कडून 31 डिसेंबरपर्यंत अनेक देशांतर्गत उड्डाणं रद्द
पुणे : देशातील अनेक विमानतळांवर दाट धुक्यामुळे उड्डाण सेवांवर परिणाम होत असताना, देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो (IndiGo) हिने पुणे विमानतळाशी संबंधित काही देशांतर्गत उड्डाणे तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही उड्डाणे 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत रद्द राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
27
ऑपरेशनल कारणांमुळे निर्णय
विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि इतर ऑपरेशनल कारणांमुळे इंडिगोने पुण्याला जाणारी व पुण्याहून जाणारी काही नियोजित उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.
37
कोणती उड्डाणे रद्द झाली?
विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये पुढील मार्गांचा समावेश आहे.
गुवाहाटी – पुणे (6E 746)
पुणे – चेन्नई (6E 918)
वाराणसी – पुणे (6E 6884)
पुणे – वाराणसी (6E 497)
बेंगळुरू – पुणे (6E 6876)
पुणे – बेंगळुरू (6E 6877)
ही उड्डाणे डिसेंबरअखेरपर्यंत रद्द ठेवण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
“या तात्पुरत्या स्थगितीमुळे प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी आम्ही इंडिगो एअरलाइनसोबत सातत्याने समन्वय साधत आहोत,” असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
57
रिफंड आणि पर्यायी व्यवस्था
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की, “ज्या प्रवाशांनी या उड्डाणांसाठी तिकिटे बुक केली आहेत, त्यांना पूर्ण परतफेड (Refund) किंवा एअरलाइनच्या धोरणानुसार पर्यायी प्रवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी इंडिगोशी सतत संपर्कात आहोत. रद्द केलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याबाबत एअरलाइनला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.”
67
पुणे विमानतळावर नियंत्रण कक्ष स्थापन
उड्डाण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रवाशांना तात्काळ माहिती देण्यासाठी पुणे विमानतळावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उड्डाण वेळापत्रकात होणारे कोणतेही बदल किंवा नवीन अपडेट्स अधिकृत माध्यमांतून जाहीर केले जाणार आहेत.
77
प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला
विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना
थेट इंडिगो एअरलाइनशी संपर्क साधण्याचा,
किंवा अधिकृत वेबसाइट / मोबाइल अॅपवरून रिबुकिंग व रिफंडची माहिती तपासण्याचा
सल्ला दिला आहे. तसेच, विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइट स्टेटस पुन्हा एकदा तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.