स्वप्न पूर्ण करा! IndiGo मध्ये पायलट व्हायचंय? जाणून घ्या 'करोडो' रुपयांचे पॅकेज, सुविधा आणि नेमका पगार किती?

Published : Dec 06, 2025, 08:58 PM IST
IndiGo pilot salary 2025

सार

IndiGo Pilot Salary 2025 : इंडिगो एअरलाइन्स विमान कंपनी आपल्या पायलट्सना आकर्षक पगार आणि सुविधा देते. २०२५ मध्ये, फर्स्ट ऑफिसर (सह-वैमानिक) महिन्याला ₹१.५ लाख ते ₹२.५ लाख कमावतात, तर अनुभवी कॅप्टनचा पगार ₹५ लाख ते ₹१० लाखांपर्यंत असतो.

IndiGo Airlines Pilot Salary 2025 : भारताची सर्वात मोठी विमानकंपनी असलेली IndiGo Airlines (6E) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 120 पेक्षा जास्त ठिकाणी सेवा देते. वेळेवर उड्डाणासाठी ओळखली जाणारी ही कंपनी सध्या 395 हून अधिक विमानांचे ऑपरेशन करते. या मोठ्या विमानताफ्याचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी इंडिगोने 5,000 पेक्षा जास्त पायलट्सची नियुक्ती केली आहे. इंडिगोची कॅडेट पायलट ट्रेनिंग प्रोग्राम भारतातील तरुण पायलट्ससाठी अत्यंत लोकप्रिय आहे. चला तर जाणून घेऊया 2025 मध्ये इंडिगो पायलट्स किती पगार कमवतात आणि त्यांना कोणते फायदे दिले जातात.

इंडिगो एअरलाइन्सच्या पायलटचा पगार २०२५

इंडिगो हा लो-कॉस्ट कॅरिअर असल्यामुळे येथे Second Officer पद नसते. त्यामुळे सर्व पायलट्स First Officer किंवा Captain या पदावर असतात.

IndiGo First Officer Salary (सह-वैमानिक पगार)

इंडिगोतील बहुतेक First Officers हे कंपनीच्या स्वतःच्या कॅडेट प्रोग्राममधून येतात किंवा इतर कंपन्यांमधून कमी अनुभवी पायलट्स म्हणून भरती केले जातात.

महिन्याचा पगार: ₹1.5 लाख ते ₹2.5 लाख

वार्षिक पगार: ₹18 लाख ते ₹30 लाख

पगार हा पायलटच्या अनुभवावर, कौशल्यावर आणि कंपनीसोबतच्या चर्चेवर अवलंबून असतो.

IndiGo Captain Salary (कॅप्टन पगार)

कॅप्टन हे विमानाचे पूर्ण नेतृत्व करतात आणि प्रवासी व क्रूची सुरक्षितता सुनिश्चित करतात. त्यांचा अनुभव First Officers पेक्षा अनेक वर्षांनी जास्त असतो.

Senior Captains यांना 10+ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असतो आणि ते ट्रेनिंग किंवा फ्लीट मॅनेजमेंटसारखी जबाबदारीही सांभाळू शकतात.

महिन्याचा पगार: ₹5 लाख ते ₹10 लाख

वार्षिक पगार: ₹60 लाख ते ₹1.2 कोटी

IndiGo Pilots Benefits (पायलट्सना मिळणारे फायदे)

1. बोनस आणि प्रॉफिट-शेअरिंग

कामगिरीनुसार बोनस, तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रॉफिट-शेअरिंगची सुविधा उपलब्ध.

2. फ्री एअर ट्रॅव्हल

स्पेशल मोबाईल अॅपद्वारे पायलट्स व त्यांच्या कुटुंबीयांना भारतात आणि विदेशात अनलिमिटेड मोफत प्रवास.

3. कुटुंबासाठी करिअर संधी

पायलट्सच्या कुटुंबातील सदस्यांना इंडिगोच्या कॅडेट प्रोग्राममध्ये प्राधान्य मिळते.

4. ट्रेनिंग प्रोग्राम्स

पायलट्सना नव्या तंत्रज्ञानावर प्रशिक्षण, तसेच नॉन-फ्लाइंग करिअर पर्यायासाठी स्पेशल कोर्सेस.

5. CSR सहभाग

कंपनीच्या CSR उपक्रमांमध्ये कर्मचार्‍यांना सामील होण्याची संधी.

6. Daycare सुविधा

भारतातील एकमेव विमान कंपनी जिथे पायलट्स आणि क्रूसाठी सर्व हबवर डे-केअर सुविधा आहे.

7. आरोग्य आणि वेलनेस

इन्शुरन्स, काउंसिलिंग, वर्क-लाईफ बॅलन्स प्रोग्राम्स यांचा समावेश.

IndiGo Pilots कौनती Aircraft उडवतात?

इंडिगोचा विमान ताफा भारतीय कंपन्यांमध्ये सर्वात मोठा एकूण 430+ विमानं.

सध्या परिचालनात असलेली विमानं

Airbus A320-200 – 45

Airbus A320neo – 200

Airbus A321 – 131

ATR-72 – 45

Boeing 737 – 12

Boeing 777 – 2

ऑर्डरवरील विमानं

A320neo – 254

A321neo – 596

A321XLR – 69

A350-900 – 30

ATR 72-600 – 5

IndiGo CarGo कडे 3 A321-P2F कार्गो विमानं आहेत.

IndiGo Pilot कसे बनावे?

First Officer पात्रता

ATR 42/72 साठी किमान 100 तास (A320 साठी किमान तास आवश्यक नाहीत)

वय: 45–55 वर्षे

DGCA CPL, FRTO, RTR, Class 1 Medical आवश्यक

कोणताही अपघात/घटना नसावी

Captain पात्रता

एकूण फ्लाइंग अनुभव 3000 तास

मल्टी-इंजिन किंवा A320 PIC 1000+ तास

वय: जास्तीत जास्त 63 वर्षे

DGCA CPL, FRTO, RTR, Class 1 Medical

अपघात/घटना-रहीत रेकॉर्ड

इंडिगो ही भारतातील पायलट्ससाठी सर्वाधिक आकर्षक कंपन्यांपैकी एक. उत्कृष्ट पगार, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि विशाल विमान ताफा यामुळे हजारो तरुण पायलट्स इंडिगोत सामील होण्याचे स्वप्न पाहतात.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

सासूबाईंना अॅडजस्टेबल पैन्जन द्या गिफ्ट, पाहून म्हणतील सुनबाई माझी गुणांची गं!
मोठी बातमी! रेपो रेट घटला! पण तुमचा Home Loan EMI नेमका किती रुपयांनी कमी होणार? ही आकडेवारी तुम्हाला आनंद देईल!