तुमची बॅग चोरीला गेल्याची शंका असल्यास, ताबडतोब रेल्वे पोलीस किंवा RPF जवानांना माहिती द्या. हरवलेल्या वस्तूंबद्दल 'रेल मदद' (Rail Madad) ॲपवर तक्रार करता येते, असं रेल्वे अधिकारी सांगतात. तुम्ही 139 या नंबरवर कॉल करूनही मदत मिळवू शकता. तक्रार करताना तुमचा मोबाईल नंबर, ट्रेन नंबर, PNR नंबर, कोच आणि सीट नंबर, प्रवासाचा तपशील, बॅगेचा रंग, आकार, ओळखचिन्ह आणि आत असलेल्या वस्तूंची माहिती स्पष्टपणे द्या. 'रेल मदद'वर तक्रार नोंदवताना, गरज पडल्यास तुम्ही फोटो किंवा इतर पुरावे देखील अपलोड करू शकता.