Dak Seva 2.0 Mobile App : तुम्ही अजूनही पोस्ट ऑफिसच्या रांगेत उभे आहात? थांबा!, आता 'हे' एक बटण दाबा आणि मिनिटांत काम पूर्ण करा!

Published : Dec 04, 2025, 05:05 PM IST

Dak Seva 2.0 Mobile App : इंडिया पोस्टने ‘डाक सेवा 2.0’ हे नवे मोबाईल अॅप लॉन्च केले, ज्यामुळे टपाल सेवा स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्यात. या अॅपद्वारे मनी ऑर्डर, विमा हप्ते भरणे, बचत खाते व्यवहार, पार्सल ट्रॅकिंग ह्या सुविधा घरबसल्या वापरता येणार आहेत.

PREV
16
इंडिया पोस्टने ‘डाक सेवा 2.0’ हे नवे मोबाईल अॅप केलं लॉन्च

India Post Has Launched Dak Seva 2.0 Mobile App : भारतीय टपाल सेवेमध्ये ऐतिहासिक बदल घडला असून पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज आता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. इंडिया पोस्टने ‘डाक सेवा 2.0’ हे नवे मोबाईल अॅप लॉन्च करून नागरिकांना अनेक टपाल सेवा थेट त्यांच्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे अॅप ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल सुविधा देण्यासाठी तयार केले आहे. 

26
नक्की काय बदलणार?

या अॅपमुळे मनी ऑर्डर पाठवणे पूर्णपणे डिजिटल झाले आहे. आता मोबाईलवरून काही सेकंदात आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने मनी ऑर्डर करता येते.

याशिवाय,

पोस्टल आणि इतर विमा पॉलिसीचे हप्ते,

पोस्टाच्या विविध योजनांचे हप्ते,

बचत खात्याचे व्यवहार,

हे सर्व काम घरबसल्या एका टचमध्ये करता येणार आहे.

हे अॅप टपाल विभागाच्या डिजिटल मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 

36
अॅपच्या प्रमुख सुविधा, अगदी सहज आणि सोप्या

‘डाक सेवा 2.0’ अॅपमध्ये वापरकर्त्यास अनुकूल इंटरफेस देण्यात आला आहे. त्यात अनेक उपयुक्त फीचर्स आहेत.

स्पीड पोस्ट / पार्सल बुकिंग आणि ट्रॅकिंग

घरातूनच बुकिंग करा आणि तुमचे पार्सल कुठे पोहोचले आहे याचा रिअल-टाइम मागोवा घ्या.

पोस्टल विमा फी आणि हप्ते भरणे

अॅपमधूनच त्वरित पेमेंट करता येते. 

46
अॅपच्या प्रमुख सुविधा, अगदी सहज आणि सोप्या

पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग

खाते शिल्लक, ट्रान्सफर, ई-पासबुक – सर्व सुविधा उपलब्ध.

जवळचे पोस्ट ऑफिस शोधा

लोकेशन बेस्ड सुविधा ज्यामुळे नजीकचे पोस्ट ऑफिस एका सेकंदात शोधता येते. 

56
अॅपच्या प्रमुख सुविधा, अगदी सहज आणि सोप्या

टैरिफ कॅल्क्युलेटर

स्पीड पोस्ट, पार्सल किंवा इतर सेवांचे शुल्क किती लागेल? अॅप सांगेल.

ऑनलाइन तक्रार नोंदणी (Complaint Management System)

पोस्टाच्या कोणत्याही सेवेत अडचण असल्यास तक्रार नोंदवा आणि तिची स्थिती लाईव्ह ट्रॅक करा. 

66
डिजिटल भारताच्या दिशेने मोठी झेप

‘डाक सेवा 2.0’ मुळे पोस्टाच्या पारंपरिक सेवांना डिजिटल गती मिळाली असून नागरिकांचा वेळ वाचणार, प्रक्रिया सुलभ होणार आणि सेवांचा दर्जा अधिक उंचावणार आहे. ही योजना पोस्ट विभागाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories