Income Tax Return भरण्याची शेवटची तारीख आज सोमवारी, न भरल्यास काय होईल?

Published : Sep 15, 2025, 02:58 PM IST
Income Tax Return

सार

Income Tax Return भरण्याची शेवटची तारीख आज सोमवारी आहे. मुदतवाढ होणार नाही, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. आयकर रिटर्न न भरल्यास दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले आहे.

तुमचा आयकर रिटर्न (ITR Retrun) भरण्याची अंतिम मुदत आज म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी आहे. आयकर विभागाने X वर पोस्टमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही कारणास्तव आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे. अनेकांना शेवटच्या क्षणाच्या गर्दीमुळे एकाच वेळी आयटीआर भरणे शक्य झाले नाही. यासाठी आयकर विभागाला तक्रारीही आल्या होत्या. तरीही, आधीच पुरेसा वेळ देण्यात आल्याने कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नाही असे विभागाने म्हटले आहे. सोशल मीडियावर मुदतवाढ देण्यात आल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असून, त्यावर विश्वास ठेवू नका असे विभागाने स्पष्ट केले आहे.

१५ सप्टेंबरची मुदत चुकल्यास काय होईल?

तुम्ही अद्याप तुमचे आयटीआर भरले नसेल, तर आता काही तास उरले आहेत. १५ सप्टेंबरची मुदत चुकल्यास तुम्हाला मोठा तोटा होईल. कारण तुम्हाला दंड भरावा लागेल. आयकरमध्ये आधीच काही बदल करण्यात आले असून, कधीही आयटीआर भरता येईल. पण ते पुढच्या वर्षापासून लागू होईल, या वर्षी नाही.

म्हणून, १५ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज आपले आयटीआर भरण्यात अयशस्वी झाल्यास, आयकर कायद्याच्या कलम २३४F अंतर्गत करदात्यांना दंड आकारला जाईल. मुदतीत तुमचा आयटीआर भरण्यात अयशस्वी झाल्यास, तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ५,००० रुपये दंड भरावा लागेल, कमी उत्पन्न असलेल्यांना कलम २३४F अंतर्गत १,००० रुपये दंड आकारला जाईल.

दंडासह आयटीआर भरण्याची मुदत

दंडासह आयटीआर भरण्यासाठी मुदत ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत आहे. परंतु सुधारित रिटर्न (ITR-U) ३१ मार्च, २०३० पर्यंत भरता येईल. तुम्ही मुदतीत आयटीआर भरण्यात अयशस्वी झाल्यास आणि अद्याप कर बाकी असल्यास, आयटी कायद्याच्या कलम २३४A अंतर्गत थकित कर रकमेवर व्याज आकारले जाईल. हे रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेपासून ते प्रत्यक्ष भरण्याच्या तारखेपर्यंत दरमहा १ टक्के दराने व्याज आकारण्याची परवानगी देते.

ऑनलाईन आयटीआर कसा भरावा?

  • -आयकर भरण्याच्या पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जा
  • -तुमचा युजर आयडी (PAN/Aadhaar) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • -आयटीआर भरण्याच्या टॅबवर जा.
  • -लागू असलेले मूल्यांकन वर्ष आणि रिटर्न भरण्याची पद्धत निवडा.
  • -ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरण्याचा पर्याय निवडा आणि नवीन फाइलिंग सुरू करा.
  • -तुमच्या उत्पन्नानुसार आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार योग्य आयटीआर फॉर्म निवडा.
  • -माहिती तपासा आणि पुष्टी करा.
  • -थकित कर भरा.
  • -सबमिट करा आणि नंतर ई-पडताळणी करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tata च्या Curvv EV वर मिळतोय 1.60 लाखांचा Year End Discount, वाचा फिचर्स आणि किंमत!
मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार तब्बल ३ लाखांचा डिस्काउंट, सर्वच गाड्यांच्या किंमती झाल्या कमी