ICG Assistant Commandant Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 170 अधिकाऱ्यांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरू

Published : Jul 21, 2025, 10:37 PM IST
Indian Coast Guard

सार

ICG Assistant Commandant Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट CGCAT 2027 बॅचसाठी १७० पदांची भरती जाहीर. जनरल ड्यूटी आणि टेक्निकल पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

ICG Assistant Commandant Recruitment 2025: सैन्यात अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) असिस्टंट कमांडंट CGCAT 2027 बॅचसाठी 170 पदांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही संधी देशसेवेच्या दिशेने एक मोठे पाऊल असू शकते.

पदसंख्या व तपशील:

पदाचे नाव एकूण जागा

असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) 140

असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/Electrical/Electronics) 30

एकूण 170

शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 1 – जनरल ड्यूटी (GD):

कोणत्याही शाखेतील पदवी

12वीमध्ये गणित व भौतिकशास्त्र विषय आवश्यक

पद क्र. 2 – टेक्निकल:

इंजिनिअरिंग पदवी (खालील शाखांमध्ये):

Naval Architecture, Mechanical, Marine, Automotive, Mechatronics, Industrial & Production, Metallurgy, Design, Aeronautical, Aerospace

Electrical, Electronics, Telecommunication, Instrumentation, Control, Power Engineering, Power Electronics

वयोमर्यादा:

01 जुलै 2026 रोजी वय: 21 ते 25 वर्षे

SC/ST साठी: 5 वर्षे वयोमर्यादा सवलत

OBC साठी: 3 वर्षे वयोमर्यादा सवलत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारतभर

परीक्षा शुल्क:

सामान्य/OBC: ₹300/-

SC/ST: शुल्क नाही

अर्ज प्रक्रिया:

अर्ज पद्धत: ऑनलाईन

अधिकृत वेबसाइट : https://joinindiancoastguard.cdac.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

27 जुलै 2025 (रात्री 11:30 वाजेपर्यंत)

परीक्षा वेळापत्रक:

चाचणी टप्पे:

पहिली फेज: सप्टेंबर/नोव्हेंबर 2025

दुसरी फेज: जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. हे पद केवळ प्रतिष्ठेचेच नाही, तर देशसेवेचा एक सन्माननीय मार्ग आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मुंबईकरांनो, सुट्टी एन्जॉय करा! मध्य रेल्वेकडून 76 हॉलिडे स्पेशल ट्रेन्स! तिकीट बुकिंग कधी सुरू?
नवीन वर्षात करून पहा हे संकल्प, स्वतःतला बदल पाहून वाटेल ढीगभर अभिमान