
व्हॉट्सॲप हा प्लॅटफॉर्म जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. फोटो पाठ्वण्यापासून ते पेमेंट करण्यापर्यंत सगळीकडं त्याचा वापर केला जातो. पण आपल्याला कधीकधी अनोळखी प्लॅटफॉर्मवरून कॉल येतात. त्यावेळी आपण वैतागून जातो. आता तुम्ही या समस्येपासून लवकरच निवांत होणार आहेत.
आपल्याला व्हॉट्सॲपवर एक नवीन फिचर मिळालं आहे. आपल्याला अनोळखी नंबरवरून कॉल आल्यावर तो बंद कसा करायचा ते समजत नाही. तो कॉल आपल्याला हिस्ट्रीमध्ये दिसायला लागतो. त्यामुळं नंतर नेमकं आपल्याला कोणाचा कॉल आला होता ते समजायला मदत होते. आपण हा कॉल बंद करू शकणार आहेत.
आपण या फीचरचा वापर कस करू शकता त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपण व्हॉट्सॲप उघडल्यावर वरती ३ डॉट्स येतात त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी हा पर्याय निवडायचा. त्यामध्ये कॉल या पर्यायावर जायचं. त्यावर जाऊन Silence Unknown Callers असा पर्याय येतो. त्यानंतर सेव्ह नसलेले सोडून इतर कॉल बंद होतात.