EMI बाऊन्स झालाय? सिबिल स्कोर बिघडू नये म्हणून हे नक्की करा

Published : Sep 22, 2026, 12:33 PM IST
EMI बाऊन्स झालाय? सिबिल स्कोर बिघडू नये म्हणून हे नक्की करा

सार

एक EMI बाऊन्स झाला की सिबिल स्कोर खरंच ५० पॉईंट्सने कमी होतो का? किती दिवसांत पैसे भरले तर स्कोर वाचेल? EMI मिस झाल्यावर बँकेला काय सांगायचं? लेट फी ते लोन रिजेक्ट होण्यापर्यंतची संपूर्ण माहिती.

मुंबई : महिन्याचा शेवट, अकाउंटमध्ये पैसे नाहीत आणि नेमका त्याच वेळी ऑटो-डेबिटने EMI बाऊन्स होतो! लगेच मोबाईलवर मेसेज येतो - "Insufficient Funds". डोक्यात पहिला विचार येतो - आता माझा सिबिल (CIBIL) स्कोर संपला का?

घाबरून जाऊ नका, पण याला हलक्यातही घेऊ नका. एकदा EMI बाऊन्स झाला की सिबिल स्कोर खरंच खराब होतो का? याचं सरळ उत्तर आहे - हो, परिणाम नक्की होतो. पण तुम्ही किती दिवस उशीर करताय, यावर सगळं अवलंबून असतं.

सिबिल किंवा क्रेडिट ब्युरोमध्ये तुमचा रिपोर्ट ३० दिवसांच्या सायकलमध्ये अपडेट होतो. बँका किंवा NBFC खालीलप्रमाणे रिपोर्ट करतात:

- १ ते २९ दिवस उशीर: बहुतांश बँका सिबिलमध्ये याला निगेटिव्ह रिपोर्ट करत नाहीत. पण तुम्हाला लेट पेमेंट फी आणि २४% ते ३६% दराने पेनल्टी व्याज भरावं लागतं. मात्र, Bajaj Finance आणि IDFC सारख्या काही प्रायव्हेट बँका आणि NBFC ७ दिवस उशीर झाला तरी रिपोर्ट करून टाकतात.

- ३० दिवसांपेक्षा जास्त उशीर (30+ DPD): इथे खरा खेळ बिघडतो. तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये ३० DPD (Days Past Due) लिहून येतं. एकदा ३० DPD लागला की तुमचा स्कोर ७० ते १०० पॉईंट्सने खाली येऊ शकतो. म्हणजे ७५० वरून थेट ६८० वर येऊ शकतो.

- ६० किंवा ९० दिवसांपेक्षा जास्त उशीर: अशा वेळी बँकेच्या नजरेत तुम्ही डिफॉल्टर ठरता. पुढची ३ वर्षे कोणतंही चांगलं लोन, होम लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळणं जवळपास अशक्य होऊन जातं.

लक्षात ठेवा, EMI बाऊन्स होणं म्हणजे दुहेरी फटका - १) बँकेचा बाऊन्स चार्ज (४००-६०० रुपये) + २) सिबिलचं नुकसान.

EMI मिस झाला तर लगेच काय करायचं? या ४ महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करा:

१. २४-४८ तासांत पेमेंट करा: काहीही करून ३० दिवसांच्या आत पैसे भरून टाका. बँकेच्या ॲपवर जाऊन मॅन्युअल पे (Manual Pay) करा. ऑटो-डेबिटच्या भरवशावर राहू नका.

२. बँकेला फोन करून सांगा: अजिबात संकोच करू नका. कस्टमर केअरला फोन करा आणि सांगा - "टेक्निकल प्रॉब्लेममुळे बाऊन्स झालाय, मी पैसे भरले आहेत, कृपया सिबिलमध्ये रिपोर्ट करू नका". बऱ्याचदा बँक ग्रेस पिरियड (Grace Period) देते. पुरावा म्हणून पेमेंटचा स्क्रीनशॉट मेल करा.

३. ECS/NACH फेलचे चार्जेस समजून घ्या: तुमची बँकही ३००-५०० रुपये बाऊन्स चार्ज कापेल. हा चार्ज वेगळा असतो.

४. सिबिल रिपोर्ट चेक करा: ४५ दिवसांनंतर CIBIL किंवा OneScore ॲपवर तुमचा फ्री रिपोर्ट चेक करा. ३० दिवसांच्या आत पैसे भरूनही DPD दिसतोय का ते पाहा. काही चूक असेल तर सिबिल डिस्प्युट (CIBIL Dispute) रेज करा.

भविष्यात असा त्रास होऊ नये म्हणून:
- EMI च्या २ दिवस आधी अकाउंटमध्ये पैसे ठेवा.
- EMI साठी एक वेगळं अकाउंट ठेवा.
- ऑटो-पे सोबत मोबाईलमध्ये रिमाइंडर सेट करा.

एका EMI बाऊन्सने आयुष्य संपत नाही, पण सवय लागली तर तुमचा सिबिल स्कोर ३ वर्षांसाठी नक्कीच खराब होईल. त्यामुळे पहिला बाऊन्स हाच शेवटचा बाऊन्स ठरवा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

DMart Shopping Tips : डी-मार्टला जाताय? या 5 वस्तू खरेदी करणं टाळाच
Maruti Suzuki EV: ५०० किमी रेंज, ३ वर्षांत मारुती सुझुकी करणार कमाल; ईव्ही मार्केटमध्ये येणार नवीन मॉडेल्स